राजकीय

घाणेगाव-विटावा दोन्ही ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक शांततेत

Spread the love

वाळूजमहानगर/प्रतिनिधी

वाळूज औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या घाणेगाव-नारायणपूर वाडी ग्रुप ग्रामपंचायत आणि विटावा या स्वतंत्र अशा दोन्ही ग्रामपंचायतीसाठी निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि गंगापूर तहसील कार्यालयातर्फे 9 जानेवारी 2020 रोजी सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी सरासरी 80 ते 85 टक्के मतदान झाले असून, ही निवडणूक शांततेत पार पडली.

घाणेगाव, विटावा आणि नारायणपूर वाडी या ग्रुप ग्रामपंचायतीची नुकतीच विभागणी झाली आहे. त्यासाठी 8 डिसेंबर 2018 रोजी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यानंतर 19 सप्टेंबर 2019 रोजी मंजुरी मिळताच महिनाभरात वाँर्ड रचनानुसार मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी घाणेगाव-नारायणपूर वाडी या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये एकूण चार वार्डाची रचना करण्यात आली. घाणेगावसाठी सरपंच पद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या निवडणुकीत एकुण 30 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यामध्ये तीन उमेदवार हे सरपंच पदासाठी निवडणूक लढत आहे. तर वार्ड क्रमांक एकमध्ये 5 दोनमध्ये 6 तर तीन आणि चारमध्ये प्रत्येकी आठ-आठ असे एकूण 30 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. तर विटावा या स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी एसटी या प्रवर्गासाडी राखीव सरपंच पदासाठी 5 तर वार्ड क्रमांक एकमध्ये 11 दोन आणि तीनमध्ये प्रत्येकी 6-6 असे एकूण 28 उमेदवार निवडणूक लढत आहे. गुरुवारी 9 जानेवारी रोजी सकाळी सुरू झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी घाणेगाव वार्ड क्रमांक एक मध्ये 745 पैकी 644 दोन मधून 406 पैकी 373 तीन मधून 761 पैकी 644 तर वाँर्ड चार मधून 839 पैकी 725 मतदार अशा एकूण 2 हजार 751 मतदारापैकी 2 हजार 386 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच विटावा या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक एक मध्ये 478 मतदारांपैकी 421 दोन मध्ये 476 पैकी 411, तीन मध्ये 476 पैकी 420 असे एकूण 1 हजार 428 पैकी 1 हजार 252 मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावल्याची माहिती निवडणूक अधिकारी अशोक त्रिंबके, ग्रामविकास अधिकारी बी बी गव्हाणे, सुरेश काळवणे यांनी दिली. सरासरी 80 ते 85 टक्के मतदान झालेली ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली असून, मतदान यंत्रात उमेद्वारांचे नशीब बंद झाले आहे. या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी 10 जानेवारी रोजी या दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात येणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी आणि स्थानिक एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close