Uncategorized

जोगेश्वरी शिवारात खून करून मृतदेह नेवस्यात टाकणाऱ्या आरोपीस अटक

Spread the love

गंगापूर/प्रतिनिधी

वर्षे भरापूर्वी प्रेयसीच्या पतीचा खून केल्यानंतर तो पचला असतानाच त्याच्याच नात्यातील महीलेला या बाबत कुणकुण लागली सदर महिलेने या दोघांना ब्लॅकमेलिंग करून पैशाची मागणी केली तिचा वाढणारा तगादा आणि पहिल्या खुनाचे बिंग फुटण्याच्या भीतीने आरोपी अमीन रज्जाक पठाण याने ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचाच काटा काढुन जोगेश्वरी वाळुज रस्त्यावर खुन करून मुर्तदेह नेवासा तालुक्यातील जवळ खुर्द शिवारात टाकून दिला परंतु पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात मोठ्या शिताफीने तपास करीत दोन्ही खुनाचा ऊलगडा करत, श्रीरामपूर सायबर सेलच्या मदतीने चार आरोपींना 24 तासात ताब्यात घेतले.

एक वर्षापूर्वी खून झालेला सुखदेव थोरात

अरोपी अमीन पठाण वय 35 वर्ष राहणार बोलठाण तालुका गंगापूर, रतन छबुराव थोरात वय28 वर्ष, सोनाली सुखदेव थोरात वय 22 वर्ष राहणार तादुंळवाडी तालुका गंगापूर, राजू भाऊसाहेब उघडे 50 वर्ष राहणार गिडेगांव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत तर एक जण फरार आहे. आमिन पठाण यांचे सुखदेव थोरात यांच्याबरोबर मैत्रीचे संबंध होते या मैत्रीतून अमीनची सुखदेव ची पत्नी सोनाली बरोबर ओळख झाली ओळखीतून पुढे दोघात अनैतिक संबंध निर्माण झाले हा प्रकार सुखदेवला समजल्यावर दोघामधे वाद निर्माण झाला आमीन व सोनाली यांच्यात सुखदेव अडसर ठरू लागला, त्यामुळे यांच्या मदतीने 11 नोव्हेंबर 2018 रोजी सोनालीचे पती सुखदेवचा गंगापूर भागातच गळा आवळून खून केला व मृतदेह कोपरगाव शिवारात नेऊन टाकुन16 नोव्हेंबर2018 रोजी गंगापुर पोलीसात तो बेपत्ता असल्याची नोंद केली. परंतु एक वर्ष ऊलटले मात्र गंगापुर पोलिसांनी घटनेचा तपास न लावता हे प्रकरण दाबण्यात आले. सुखदेवचा खुन झाल्यापासून मोबाईल मात्र सोनाली वापरत होती अमीन व सोनाली यांनी सुखदेव यास मारल्याची कुणकुण सोनालीच्या नात्यातील मंगल दुशिंग वय 35 हीला समजले ती खुनाचे बिंग फोडण्याची धमकी देऊन पैस्यासाठी दोघांना ब्लँकमेल करु लागली तिच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अमीन व सोनालीने तीचा काटा काढण्याचे ठरवले शनिवारी सात डिसेंबर रोजी जोगेश्वरी वाळुज रस्त्यावर अमीन व सोनाली यांनी रतन थोरात, राजु ऊघाडे, आणखी एकाच्या मदतीने मंगलचा गळा दाबून खुन करण्यात आला. हा खुन औरंगाबाद जिल्ह्यात करायचा आणि लगतच्या नगर जिल्ह्यात आणून टाकायचा हा फंडा सुखदेवच्या खुना पासून आरोपीच्या चागंलाच पचनी पडला होता, त्यामुळे मंगल चा मृतदेह रविवारी आठ डिसेंबर रोजी जवळे खुर्द तालुका नेवासा शिवारात कँनाल लगत आणून टाकला बेवारस मृतदेहस नेवासा पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासाची चक्रे फिरवत एक नव्हे दोन खुन प्रकरणाचा ऊलगडा करण्यात आला तसेच श्रीरामपूर सायबर सेलच्या माध्यमातून चार आरोपींना 24 तासात जेरबंद केले, मगंलच्या खुनाचा तपास भरकटला जावा म्हणून आरोपींनी तीच्या मृतदेहा जवळ वर्षाभरा पुर्वी खुन केलेल्या सुखदेवचा सोनाली वापरत असलेला मोबाईल व त्याचे नाव असलेली चिठ्ठी लीहुन ठेवली होती याच मोबाईल आधारे नेवासा पोलीस व श्रीरामपूर सायबर सेलच्या पथकाने आधी अमीन व नंतर सोनाली पर्यंत माग काढून पाच पैकी चार अरोपींना अटक केले असून पुढील तपास नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विठ्ठल गायकवाड, जयसिंग आव्हाड,कल्पना गावडे, मनीषा घाणे, जयश्री काळे, आदी करत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close