औरंगाबाद

मसिआच्या पाठपुराव्याला यश -छावणी येथील उड्डाणपूल नोव्हेंबर पर्यंत होईल पूर्ण: रेल्वे विभागाकडून आश्वासन

Spread the love

औरंगाबाद/प्रतिनिधी
औरंगाबाद अहमदनगर मार्गावर छावणी परिसरातील सध्या असलेल्या एकादरी व अरुंद रेल्वे उड्डाणपूलामुळे शहरातून अहमदनगर, पुणे या शहरांकडे आणि वाळूज या मुख्य औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना गेल्या अनेक वर्षापासून अनेकवेळा वाहतुक कोंडी, अपघात, जिवितहानी अशा घटनांमुळे अतोनात त्रास सहन करावा लागला आहे. सध्याचा उपलब्ध उड्डाणपूल हा अत्यंत अरुंद असल्यामुळे तेथे
वाहतुक्कोंडी होवून दुतर्फ वाहनांची लांबच लांब रांग लागणे ही नित्याची बाब झालेली आहे. तेथे होणाऱ्या वाहतुक्कोंडीमुळे आणि घडलेल्या अपघातामुळे या गभीर अडचणींवर उपाय म्हणून तेथे उड्डाणपूल बांधण्याचे रेल्वे प्रशासनाने निश्चित केले होते. मसिआ व इतर औद्योगिक संघटनांनी शासनाकडे आणि रेल्वे मंत्रालयाकडे या प्रश्नाचा वेळोवेळी सातत्याने पाठपुरावा केला आहे. दक्षिण मध्ये रेल्वे प्रशासनाच्या नांदेड विभागातील DURCC समितीमध्ये मसिआचे पदाधिकारी सदस्य असल्यामुळे त्यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून आणि पत्रव्यवहार करुन या विषयाचा पाठपुरावा केला. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (मसिआ) ने दक्षिण मध्ये रेल्वेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करुन या विषयाचा पाठपुरावा चालू ठेवला आहे. नविन उड्डाणपूलाच्या कामास गती देवून तो लवकरात लवकर पुर्ण करावा अशी विनंती मसिआने दि.१७ फेब्रुवारी २०२० रोजीच्या पत्राव्दारे दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केली होती. नविन उड्डाणपूलाच्या कमास सुरुवात झाली आहे आणि हे काम नोव्हेंबर २०२० पर्यत पुर्ण करण्याचे उद्दीष्ट रेल्वे बोर्डाने निश्चित केले असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता यांनी मसिआला पत्राच्या उत्तरादाखल कळविले आहे. हा नविन उड्डाणपूल लवकरात लवकर तयार करावा म्हणून औरंगाबाद शहराचे सर्व माजी व विद्यमान आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी या सर्वांनी राज्य शासन व रेल्वे मंत्रालय यांच्याकडे मागणी करुन त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याचे हे फळ आहे. सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याने आणि प्रशासकीय सहकार्याने पूलाचे काम जलदगतीने होईल आणि छावणी येथे रहदारीस नविन उड्डाणपूल उपलब्ध करण्याचे औरंगाबादकरांचे स्वप्न लवकरच पुर्ण होईल असे चित्र आता दिसत आहे. असे मसिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ, उपाध्यक्ष किरण जगताप व नारायण पवार, सचिव भगवान राऊत व राहूल मोगले, सहसचिव विनय राठी व अब्दुल शेख, प्रसिध्दीप्रमुख सचिन गायके व सहप्रसिध्दीप्रमुख सुमित मालानी आणि इतर पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्य यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close