औरंगाबाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लघुउद्योजकांना मदतीसाठी “मसिआ कनेक्ट” मोहिम सुरू

वाळूज औद्योगिक परिसरात शुभारंभ, उद्योजकांचा उस्फुर्त प्रतिसाद

Spread the love

औरंगाबाद/प्रतिनिधी

औरंगाबाद येथील चिकलठाणा व वाळूज औद्योगिक क्षेत्रात दि ०३ ऑगस्ट २०२० रोजी पासून मराठवाडा असोसिसेशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर (मसिआ ) तर्फे मसिआ कनेक्ट या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या औरंगाबाद ची ओळख खऱ्या अर्थाने औद्योगिक वसाहतीमुळे निर्माण झाली. आज विविध औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कारखाने आणि त्यातून निर्माण होणारे रोजगार यांच्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले.पण कोरोना रोगाच्या महामारीमुळे सर्व उद्योग बंद असल्याने उद्योजक ग्रासले आहे, आणि त्यामध्ये लघु उद्योजकांना तर उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. या काळात लघु उद्योजकांना प्रचंड आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. बऱ्याच उद्योजकांचे हातातील ऑर्डर्स गेल्या, परप्रांतीय कामगार काम सोडून गेले, या आणि याव्यतिरिक्त अनेक समस्या आज लघु उद्योजकाला भेडसावत आहेत. परंतु त्यातूनही खचून न जाता लघु उद्योजक हा भक्कम पणे उभा राहिला पाहिजे तरच औद्योगिक वसाहतीला गती मिळेल असा सकारात्मक उद्देश समोर ठेऊन आजपासून मासिआच्या कार्यकारिणीने ” मसिआ कनेक्ट ” या मोहिमेला सुरुवात केली आहे. “मसिआ कनेक्ट” च्या माध्यमातून उद्योजकांपर्यंत मासिआचे कार्यकारिणी पोचणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्रत्येक विभागामध्ये जाऊन प्रत्यक्ष उद्योजकांना भेटून त्यांना कोणत्या समस्या आहेत त्या जाणून घेणार असून शासनदरबारी त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आज वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एल सेक्टरपासून या मोहिमेची सुरुवात झाली असून यापुढील ३ ते ४ दिवसात उर्वरित पूर्ण वाळूज औद्योगिक क्षेत्रात ही मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेमुळे उद्योजक नवीन उमेद देण्याचा मसिआचा प्रयत्न असणार असल्याचे मत अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी यावेळी व्यक्त केले. या दरम्यान ) उद्योजकांनी आपल्या समस्या, आपली मते आमच्या पर्यंत पोचवावी असे आवाहन यावेळी उपाध्यक्ष नारायण पवार व किरण जगताप, सचिव भगवान राऊत व राहुल मोगले , प्रसिद्धी प्रमुख सचिन गायके, सह प्रसिद्धी प्रमुख सुमित मालाणी, आणि संपूर्ण कार्यकारिणीतर्फे करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close