संगमनेर

कोरोना बाधित भाऊ बहिणीने कोविड सेंटरमध्ये साजरे केले रक्षाबंधन

Spread the love

संगमनेर/अमोल भागवत

संगमनेर नगर परिषदेच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये ( केनडी हॉल )येथे नगरपरिषदेने कोविड – 19 सेंटर सुरू केले आहे. सदर ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येतात. यामध्ये शहरातील एका भागातील दोन कुटुंबे बाधित असल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत सदर कुटुंबांना क्वारंटाईन केले. कॉरंटाईन केलेल्या व्यक्तींमध्ये एका कुटुंबातील सख्या भाऊ-बहिणीचा समावेश होता. रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे सदर भाऊ बहीण यांना रक्षाबंधन करणे शक्य नव्हते. परंतु डॉ. अमोल जंगम, डॉ. बागवान राजेश देवकर, डॉक्टर सविता माने, स्वाती रक्ताटे, सुरेखा वाळुंज, कविता शिंदे, मंगल आंधळे, संगीता बर्डे अरविंद गुजर, सतीश बरुंगुले ,शशिकांत जोशी आदींनी कोविड सेंटरमध्ये सोशल डिस्टनंसचे पालन करत रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करून दोघा भाऊ बहिणीच्या चेहर्‍यावर हास्य फुलले. कोविड सेंटरमध्ये केलेल्या या आगळ्या – वेगळ्या रक्षाबंधन कार्यक्रमाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, सौ. सुमित्राताई दिड्डी, उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे .तहसीलदार अमोल निकम. वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर पोखरकर, डॉ. संदीप कचोरिया तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका व मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदींनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close