औरंगाबाद

सरपंच व ग्रामसेवक घाईघाईने निधी खर्च करण्याच्या तयारीत, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचा आरोप

Spread the love

गंगापूर/ महंमद तांबोळी

ग्रुप ग्रामपंचायत, तांदुळवाडी, उत्तरवाडी व बोलठाण मधील पडुन असलेला सन २०१४ ते २०१९ मधील चौदावित्त आयोगाचा निधी सरपंच व ग्रामसेवक हे घाईघाईने  निधी खर्च करण्याच्या प्रयत्नात आहे. या निधीचा आपहार करून सरपंच व ग्रामसेवक हे निधी लाटण्याच्या प्रयत्नात असल्याने या निधी खर्च करण्यास मनाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रुप ग्रामपंचायत, तांदुळवाडी, उत्तरवाडी व बोलठाण मधील पडुन असलेला सन २०१४ ते २०१९ मधील चौदाविक्त आयोगाचा निधी खर्च करु नये  २०१४ मध्ये गुप ग्रामपंचायत तांदुळवाडी चे सरपंच अजितसिंग भगवानसिंग राजपुत  असुन त्यांनी व ग्रामसेवक यांनी साडेचार वर्षात फक्त उत्तरवाडी व बोलठाण मध्ये ज्या वॉर्डातुन राजगीरे यांनी पाठपुरावा करुन स्वत:च्या वॉर्डात कामे करुन घेतली. परंतु ग्रामपंचायतने तथा सरपंच व ग्रामसेवक यांनी वॉर्ड क्र. १ व २ मध्ये कुठल्याही प्रकारचे निधीचा वापर न करता कामे केलेली नाही व आजही तो निधी तसाच पडुन आहे., शासनाने दिनांक 4 मार्च रोजी शासन निर्णयानुसार पडुन असलेला निधी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये परत पाठवावा असे निर्देश देण्यात आले आहे. शासनाने ज्या ग्रामपंचायतीचा कालावधी संपण्याच्या मार्गावर असेलअशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतीचा कालावधी हा दिनांक १४/०९/२०२० रोजी संपुष्टात येणार असल्याने . सरपंच व ग्रामसेवक हे घाई घाईने पडुन असलेला निधी खर्च करण्याच्या प्रयत्नात आहे.जेव्हा की, सदर निधी हा आपहार करून सरपंच व ग्रामसेवक हे निधी लाटण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच गेल्या दोन वर्षापासुन सरपंच यांनी कुठल्याही प्रकारची मासिक मिटींग घेतलेली नाही तसेच ग्रामसभा सुध्दा. घेतलेल्या नाही. त्यामुळे सरपंच हे ग्रामसेवकाच्या संगणमताने मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करुन ग्रामपंचायतीच्या खात्यावर पडुन असलेला निधीचा गैरवापर करुन भ्रष्टाचार करण्याच्या प्रयत्नात असल्याने, ग्रुप ग्रामपंचायत तांदुळवादी, उत्तरवाडी व बोलठाण ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये पडुन असलेला निधी खर्च करु नये असे आदेशीत करण्यात यावे.जेव्हा की, ग्रामपंचायतीचा कालावधी हा दिड महिन्याचा शिल्लक असल्यामुळे सदरचा, बोगसपणा व रक्कमेचा आपहार होऊ नये या काळजीपोटी सदर सरपंच व ग्रामसेवक यांना निधी खर्च करण्यास निर्बध करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर भाऊसाहेब  राजगिरे, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ जगदाळे, दत्तू राशिनकर अनिल राजगिरे, विकास जगदाळे, रमेश थोरात, अशोक गोरे, बाबासाहेब राऊत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close