औरंगाबाद

खुलताबाद तालुक्यातील विद्यार्थ्यांवर झाला मार्कांचा पाऊस, दहावीचा निकाल 91.89 टक्के

Spread the love

खुलताबाद / प्रतिनिधी

तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल 91.89 टक्के  लागला असून 2292 विद्यार्थ्यांनी परीक्षा नोंद केली होती.प्रत्यक्षात 2283 विद्यार्थी परीक्षा दिली त्या पैकी 2098 विद्यार्थी पास झाले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सचिन सोळुंके यांनी दिली. खुलताबाद तालुक्यात इयत्ता दहावीच्या परिक्षेसाठी एकूण तेहतीस 33 विद्यालयांच्या विद्यार्थी परिक्षेत उतिर्ण झाले असून खुलताबाद तालुक्याचा निकाल 91.89 टक्के लागला आहे .बुधवारी दुपारी एक वाजता दहावीचा निकाल इंटरनेटवर जाहीर करण्यात आला . यंदा तालुक्यातील बहुतांशी शाळांचे नव्वद टक्के पेक्षा जास्त लागले आहे ,या सर्व शाळांचे तालुकाभरातुन कौतुक होत असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तालुक्यातील दहावीच्या शाळा व त्यांची टक्केवारी

खुलताबाद घृष्णेश्वर विद्यालय 84.61, टक्के, मौलाना आझाद हायस्कुल 97.43%, कमला नेहरू कन्या विद्यालय 92.10%, मराठी माध्यमिक विद्यालय 95.65%, कसाबखेडा जिल्हा परिषद प्रशाला 93.48%, गल्लेबोरगाव जिल्हा परिषद प्रशाला 93.09 टक्के , राजेराय टाकळी जिल्हा परिषद प्रशाला 62.74% बाजारसावंगी जिल्हा परिषद प्रशाला 89.72%, राजेराय टाकळी ऊर्दू माध्यमिक विद्यालय 100% , वेरूळ गुरूदेव समंत विद्यालय 100% ,संतजनार्दन स्वामी विद्यालय 100% गदाना न्यु हायस्कुल 86.99%, वडोद खुर्द न्युहायस्कुल 92.85%, आपले विद्यालय 92.78% ,बोडखा कैलास विद्यालय 72.30% , दरेगाव महाराजा सायाजीराव विद्यालय 92.72%, तीसगाव येथील तीसगाव विद्यालय 97.72%, घोडेगाव सदगुरू जनेश्वर वीध्यालय 92% सुलतानपुर साहेबराव पाटील विद्यालय 95.95% ,भडजी देवी गिरजा माता विद्यालय 88.58%, पळसवाडी नाथ माध्यमीक विद्यालय 91.83%, नाथ माध्यमिक गल्ले बोरगाव 96.07% नाथ माध्यमिक पिंपरी 100 % राजमाता आश्रम शाळा वेरुळ 100% चंद्रकला विद्यालय खांडीपिंपळगाव 86.60 टक्के, बाबाबुर्हानोद्दीन विद्यालय खुलताबाद 98.57 टक्के, शांताराई विद्यालय ताजनापूर 70.73%,मुक्तानंद विद्यालय खुलताबाद 68.57 टक्के,अपॉलिस फेथ किड्स गार्डन इंग्लिश स्कूल 100 % किड्स अँपायर इंग्लिश स्कूल 90.47% साई पब्लिक स्कूल 100 %स्वामी विवेकानंद बाजार सावंगी 93.33% मालोजी राजे वेरुळ 75% निकाल या प्रमाणे लागला असून खुलताबाद तालुक्यातील सर्व शाळेचा दहावीचा एकुन 91.89 टक्के नीकाल लागला आहे. राज्य शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (29 जुलै) जाहीर झाला आहे. ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात 18.20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक 98.77 टक्के निकाल कोकण विभागाचा लागला असून सर्वात कमी 92% निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close