औरंगाबाद

कृषी सेवा केंद्रातील पाच लाखांचा माल चोरणार्या चोरट्यांना रंगेहात पकडले

गंगापुर/महमंद तंबोली
गंगापूर शहरातील वैभव मशिनरी व कृषी सेवा केंद्रातील कृषी साहित्य चोरून नेणार्या चोरट्यांना मालकाच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले. या विषयी अधिक माहीती अशी की, शहरातील शिवाजी महाराज चौक येथे वैभव रविंद्र गुंदेचा यांचे वैभव मशिनरी व कृषी सेवा केंद्र या नावाने दुकान आहे. त्यांच्या दुकानात सहा ते सात कामगार ठेवलेले आहे. दि.१५ रोजी त्याचे दुकानातील कामगारांनी बनावट ग्राहक तयार करुन आठ इंची पाईप व अन्य पाच लाखाचे कृषी साहीत्य दुकानाच्या
पाठीमागचे शटर जवळ छोटा हत्ती क्र. एम एच २० ई एल ६४८३ हा बोलावून त्यामध्ये बिल न बनविलेल्या पावती ऐवजी ८३ हजार रुपयाचे पिकासाठी चारण्याचे खत व औषधे टाकून दिली ही गोष्ट दुकान मालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली. पोलीसांनी पाच आरोपी ताब्यात घेतले आहे. यात शिवम गंगाधर जगताप वय.२० वर्षे रा.शिंदवाडी, ता. गंगापुर, अतुल नंदु कान्हे वय.२० वर्षे रा. सिरजगाव ता. गंगापुर, शेख रऊफ ऊर्फ बाबा हसन वय.५४ रा.बाजारतळ गंगापुर, शारुख मन्सुर शेख वय.२३ वर्षे, रा.उत्तरवाडी, ता.गंगापुर, अनिल काशीनाथ पवार रा.संजराबाद, ता.गंगापुर आरोपी एकुण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचे अनुशंगाने पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील , उपविभागीय अधिकारी संदिप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली पोनि संजय लोहकरे, पोउपनि एस जे शेख, स फौजदार गणेश काथार, पोलीस नाईक लक्ष्मण पुरी, सिमोन वाघमारे, पोलीस अमंलदार बलवीरसिंग बहुरे ,राहुल बडुमार, अमान्न देवकाने तपास करत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close