औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यात उद्यापासून होणारा लॉकडाऊन रद्द-जिल्हाधिकारी यांची माहिती

औरंगाबाद /प्रतिनिधी

उद्यापासून जिल्हाभरात लॉकडाऊन लागणार असे घोषित करण्यात आले होते. परंतु मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या लोकप्रतिनिधी सोबतच्या बैठकीत विविध प्रश्नावर चर्चा झाली यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री आणी मुख्य सचिव यांच्या सोबत झालेल्या चर्चेअंती लॉकडाऊन स्थगित करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी रात्री दहा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाप्रशासनासह सर्वच दिवसरात्र एक करत प्रयत्न करत आहेत. संख्या आटोक्यात आणण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता, परंतु लोकप्रतिनिधी सोबत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली, यामध्ये सामान्य नागरिकांना विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांनी लॉकडाऊन संदर्भात विविध सूचना केल्या असून त्या सूचनांचे पालन करण्यासाठी अवधी लागणार असल्याने मंगळवारी रात्री लागणारा लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. या दरम्यान सध्या लागू असलेला आदेश नियमित सुरू राहणार आहे.या लॉकडाऊनला खासदार इम्तियाज जलील यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. आज (31) रोजी जलील पैठण गेट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा देखील काढणार होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close