कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गंगापूरचा आठवडी बाजार बंद
गंगापूर शहरात दोन दिवस कडक लाॅकडाऊनचा प्रशासनाचा निर्णय

गंगापूर/प्रतिनिधी
जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले असून, औरंगाबाद शहर व तालुक्यात ११ मार्च ते ४ एप्रिल पर्यत अंशत.लाॅकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहेत ११ मार्च पासुन ते ४ एप्रिल पर्यत. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. दर शनिवार व रविवारी कडक लाॅकडाऊन राहणार असून, त्या दिवशी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे. त्या अनुषंगाने गंगापूर शहरात शनिवार व रविवार रोजी कडक लाॅकडाऊन राहणार असून, त्या दिवशी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार .जर कोणी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी सांगितले तर गंगापूर शहराचा भरणारा शनिवारचा आठवडी बाजार बंद राहणार असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी सांगितले.