गोवा राज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा ४ लाखाचा मद्यसाठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

औरंगाबाद/प्रतिनिधी
गोवा राज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी येणारा ४ लाखाचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून हि कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे.
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग औरंगाबाद हे त्यांच्या सहकारी जवानांवह आज रोजी बिडकीन – पैठण, ता. पैठण परिसरात गस्तीवर असतांना खबऱ्याकडून गुप्त माहिती मिळाली की, धम्मा भिमा वक्ते व गणेश अच्युतराव लहाने रा. मु.पो. पाचेगाव, ता. गेवराई, जि. बीड हे दोघे महिंद्रा पिकअप जीप क्र. एम.एच. १७ के. ९७६२ मधुन परराज्यात विक्री करिता असलेला विदेशी मद्यसाटा बेकायदेशिरपणे बाळगुन बिडकीन – औरंगाबादच्या दिशेने वाहतुक करणार आहे. त्यामुळे शरद फटांगडे, निरीक्षक यांनी पथकासह बिडकीन, ता. पैठण परिसरातील औरंगाबाद – पैठण रोडवर सरकारी पाण्याच्या टाकीजवळ सापळा लावला असता त्याठिकाणी महिंद्रा पिकअप जिपक एम.एच. २७ के. ९७६२ ही धम्मा भिमा वक्ते व गणेश अच्युतराव लहाने यांच्यासह मिळून आली. सदर जीपची झडती घेतली असता जिपमध्ये १ फुट उंचीचा लोखंटी पत्रे टाकून गाळा / कण्या तयार करण्यात आल्याचे व कप्याचे वर जुने कुलर व लोखंडी रैंक ठेवलेले मिळून आले व त्याखालील कप्यात गोवा राज्यात निर्मित व फक्त गोवा राज्यात विक्रीकरिताचा तसेच गोवा राज्यात महसुल जमा केलेला मॅकडॉल नं.१ ओरिजनल हिस्की १०० मि.ली. समतेच्या विविध पंच क्रमांकाच्या १९५२ सिलचंद बाटल्या मिळून आल्या. सदर गुन्हयालील जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे ३९४२२०/रुपये आहे. तसेच सदरचा मद्यसाठा बेकायदेशिरपणे महाराष्ट्रात आयात झाल्याने महाराष्ट्र शासनाचा मोठया प्रमाणावर उत्पादन शुल्क महसुल बुडालेला आहे. सदर प्रकरणी मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे अज्ञामिनपान कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरचा मद्यसाठा पाचेगाव, ता. गेवराई येथील रामेश्वर बळीराम हातोटे सराईत गुन्हेगाराच्या मालकीचा असल्याचे व तो या गुन्हयातील मुखा सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रदिप पवार, विभागीय उपायुक्त औरंगाबाद यांनी नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क बीड यांना संपर्क करुन रामेश्वर बळीराम हातोटे याची घरझडती घेवून त्यास ताब्यात घेण्याचे सुचना दिल्याने त्यांनी रामेश्वर हाटबटे यास पाचेगाव, ता. गेवराई येथील राहते घरातून ताब्यात घेवून तपासी अधिका-यांकडे हस्तांतर केले आहे.
सदरची कारवाई कांतीलाल उमाप,आयुक्त , राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदिप पवार विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद, सुधाकर कदम, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, शरद फटांगडे यांच्या पथकाने केली. सदरच्या कारवाईत दुय्यम निरीक्षक विजयकुमार आगळे व शरद रोटे, जवान विजय मकरंद, अमोल अन्नदाते, राजु अंभोरे, हर्षल बारी व नवनाथ धुगे यांचा समावेश होता.