अहमदनगर

संचारबंदी आजपासूनच ! सर्वच दुकाने राहतील बंद

लोणार/संदीप मापारी पाटील

जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी नुकतेच एक शुद्धीपत्रक काढून संचारबंदीची वेळ एका दिवसाने वाढविली आहे. यापूर्वीच्या आदेशात शनिवार सायंकाळी 5 वाजेपासून सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली होती. परंतु आताच्या आदेशाने आज, शुक्रवार, 26 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी सोमवार, 1 मार्च च्या सकाळी 7 वाजेपर्यंत राहील. संचारबंदी दरम्यान केवळ मेडिकल, हॉस्पिटल 24 तास उघडे राहतील तर दूध विक्रीला मर्यादित वेळेत म्हणजे सकाळ ते दुपारी आणि संध्याकाळी 2 तास वेळ राहील. इतर सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार असल्याचे आदेशात नमूद आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close