औरंगाबाद

गंगापूर नगरपालिकेत विषय समितीच्या सभापतीची निवड

गंगापूर/ प्रतिनिधी

गंगापूर नगरपालिकेत विषय समिती सभापतीची निवड बुधवारी (दि.२४) रोजी   विविध विषय समितीच्या सभापती पदाची निवड करण्यात आली या वेळी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विषय समिती सभापती पदाची निवड करण्यात आली. या  बैठकीला  नगराध्यक्षा वंदना प्रदीप भैय्या पाटील, मुख्याधिकारी संतोष आगळे यांची उपस्थिती होती. यावेळी नगरपालिकेत विविध विषय समितीच्या सभापती पदाची निवड करण्यात आली. बांधकाम सभापती अविनाश पाटील, स्वच्छता आरोग्य समिती सभापती पल्लवी शिरसाट, पाणीपुरवठा समिती सभापती सफिया बानो  गणी कुरेशी, महिला बालकल्याण समितीच्या सभापती उर्मिला खैरे, नियोजन व वित्त समितीच्या सभापती मंगलाबाई राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रदीप पाटील, अर्जुनसिंग राजपूत,मुकुंद जोशी आयशा बेगम नईम मंन्सूरी, मोहसीन चाऊस, आबासाहेब शिरसाट, मारुती खैरे, विजय पानकडे, कैलास साबणे, दत्तात्रय साबणे, दीपक साळवे, प्रकाश जैस्वाल, नईम मन्सूरी,  अमोल साळवे, वाजिद कुरैशी,  संजय मनगटे, कल्याण बाराहते, रामेश्वर पाटील, भारत पाटील आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close