अडगाव बु १०० टक्के कडकडीत बंद, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने कडकडीत बंद

अडगाव बु/संजय भटकर
जिल्हा प्रशासनाने शनिवारी रात्री १२ वाजता पासुन तर सोमवारी सकाळी ६ वाजे पर्यत लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या आव्हानाला प्रतिसाद देत अडगाव बु वाशीयांनी उत्फुर्तपणे प्रतिसाद देत कडकडीत १०० टक्के लाॅकडाऊन यशस्वी केला. अकोला जिल्ह्यातसह ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अकोला जिल्हाधिकारी मा. जितेंद्र पापळकर यांनी दररोज रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली असून शनिवारी रात्री १२ वाजता पासून तर सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी अडगाव बु ग्रामपंचायतच्या वतीने लाऊड स्पीकरद्वारे गावात लाॅकडाऊन पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. गावातील नागरीकांनी आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मेडिकल, दवाखाने दूध डेअरी आदी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवसायिकांनी कडकडीत बंद पाळला यावेळी गावातून जाणारे संपूर्ण रस्ते ओस पडले होते. तसेच पोलीस प्रशासनाने विना मास फिरणाऱ्याना दम दिला असल्याचे पहावयास मिळले. गावातील नागरिकांनी लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी केली असल्याने संचार बंदीच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य केले असल्याचे दिसुन आले. यावेळी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली अडगाव बु पोलीस चौकीचे ASI पुडंलीक राऊत साहेब ,इंगळे मेजर ,बोरकुटे मेजर, मुळे मेजर,पोलीस पाटील हितेश हागे, ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी कडक पोलिस बंन्दोवस्त ठेवला होता.