गंगापुरात १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचा व शिवतीर्थचा लोकार्पण सोहळा-नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील

गंगापूर/प्रतिनिधी
महंत रामगिरी महाराज, शाक्यपुत्र अमृतानंद बोधी, फादर विल्फ्रेड सलढाणा, मौलाना युसुफ यांचे होणार संतपूजन
प्रमुख उपस्थितीत आ.प्रशांत बंब,आ.अंबादास दानवे,किरण पाटील डोणगावकर,मा.आ.कैलास पाटील
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर शहरात शिवजयंतीला अर्थात 19 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजेला शिवकार्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंचधातूंच्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत शिवकालीन मर्दानी खेळ लाठी/काठी,तलवारबाजी,भाले,व इतर मैदानी खेळांची कवायत होणार असून शहरातील पालकांनी आपल्या मुलांना दुपारी साडेतीन वाजेनंतर माँसाहेब जिजाऊ,छत्रपती शिवराय ,छत्रपती संभाजीराजे,
यांच्या वेशभूषेत आणावे, कारण उत्कृष्ट वेषभूषा असणाऱ्या मुलांना व त्यांच्या पालकांना गौरविण्यात येणार आहे शिवशाहीर प्राध्यापक प्रवीण जाधव यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम दुपारी चार वाजता असून बालशिवशाहिर स्वानंदी ठाणगे हिच्याही पोवाड्याचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी ठीक सहा वाजता शिवतीर्थ येथील छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे त्यानंतर सरला बेटाचे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरी महाराज,रांजणगाव नरहरी येथील भन्तेजी शाक्यपुत्र अमृतानंद बोधी,फादर विल्फ्रेड सलढाणा, गंगापूरचे मौलाना युसुफ आदींचे आयोजकांचे हस्ते संतपूजन होणार आहे. दरम्यान त्यानंतर साडेसहा वाजता प्रसिद्ध जर्नालिस्ट नौशाद उस्मान,इंजि.अब्दुल वाजेद कादरी यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून गंगापूर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब,शिवसेना जिल्हाप्रमुख तथा औरंगाबाद/जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार डॉ अंबादास दानवे,जिल्हा बँकेचे संचालक किरण अशोक पाटील डोणगावकर,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा.आ.कैलास पाटील राहणार असून या भव्य दिव्य न भूतो न भविष्यती असणाऱ्या छत्रपती शिवराय यांच्या पंचधातूंच्या अश्वारूढ पुतळा व शिवस्मारक असणाऱ्या शिवतीर्थच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा भव्य दिव्य कार्यक्रमाची देहा याची डोळा पहावा असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील व उपनगराध्याक्षा मंगलताई अर्जुनसिंग राजपूत व नगरपरिषदचे मुख्यअधिकारी संतोष आगळे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी व शहरवासीयांनी केले आहे.