करजगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदी कांग्रेसच्या इंदिराताई वानखडे तर उपसरपंचपदी बि,जे,पीचे महेंद्र कांडलकर

कैलास गजबे/चांदुरबाजार
चादुरबाजार तालुक्यातिल करजगाव या ठिकाणी आज दि १५/०२/२०२१ रोजी सरपंच उपसपंच पदाची निवडणूक झाली या निवडणूकीकरीता निवडणूक अधिकारी म्हणून पंकज चव्हाण यांनी निवडणूक पार पाडली सरपंच पदासाठी इंदिराताई अ, वानखडे यांचा एकच अर्ज आल्यामुळे सरपंचपदी कांग्रेसच्या इंदिराताई अ, वानखडे यांची अविरोध निवड झाली तर उपसरपंच पदासाठी दोन अर्ज आले १)रोषन मालधुरे २) महेंद्र उर्फ सोनू कांडलकर त्यामुळे निवडणूक अधिकारी श्री पंकज चव्हाण यांनी गुप्त पद्धतिने मतदान घेतले मतदान झाल्यावर दोघाच्याही मताची मोजणी करण्यात आली त्यात १)रोषन मालधुरे यांना ८ मते मिळाली तर २) महेंद्र उर्फ सोनू कांडलकर यांना ९ मते मिळाली त्यामुळे निवडणूक अधिकारी यांनी सोनु कांडलकरयांना उपसरपंचपदी निवडुन आल्याचे घोषीत केले सरपंच व उपसरपंच निवडी दरम्यान कोणतीही गडबड होवू नये यासाठी शिरजगाव पोलीस स्टेशनचा चोख बदोबस्त होता करजगाव येथिल पोलीस पाटील श्री अश्विन मेहरे हे उपस्थित होते तसेच गावातिल नागरिक उपस्थित होते.