औरंगाबाद

गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांची औरंगाबाद येथे बदली तर त्यांच्या जागेवर संजय लोहकरे नियुक्त

गंगापूर/प्रतिनिधी

गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे  यांची औरंगाबाद वाहतूक शाखा येथे बदली तर त्याच्या जागेवर संजय लोहकरे यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी नुकतीच केली आहे. गंगापूर पोलीस स्टेशन 23 मार्च 2019 पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी  पोलीस स्टेशनचे पदभार स्वीकारल्यानंतर गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेले खुन उघडकीस आणुन  सर्वात चांगली कामगिरी करणारे व तपास करणारे गंगापूर पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांची औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक  मोक्षदा पाटील यांनी सुरवसे यांची विनंती अर्जा नुसार वाहतूक शाखांमध्ये  बदली केली तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांची गंगापूर येथील पोलीस स्टेशनमध्ये बदली केली असून त्वरीत पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे साहेबांनी गंगापूर शहरांमध्ये व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली आहे.  विशेष म्हणजे गंगापूर पोलीस स्टेशन चा पदभार तीन वर्ष कोणत्याही अधिकाऱ्यांनी चांगली पद्धतीने केले नाही. पंधरा वर्षानंतर अशी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी पोलिस स्टेशनचा नक्शा बदलला. त्यानंतर चांगले पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे अधिकारी म्हणून ते गंगापूर तालुक्यामध्ये ओळख  केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close