ब्रेकिंग
ग्रामपंचायत कार्यालय व एकता किक्रेट क्लब गोविंदपुर यांच्या संयुक्त विघमाने टेनिस बॉल क्रिकेट सामने

कैलास गजबे/चांदुरबाजार
करजगाव येथुन जवळच असलेल्या गोविंदपुर या ठिकाणी टेनिस बाॅलचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले आज दि,१२/०२/२०२१ रोजी शिरजगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन परदेशी, मनोज जैस्वाल, विकास कांडलकर , सुरेश गणेशकर हे प्रमुख पाहुने होते खेळाच्या पहिल्या दिवशी शिरजगाव पोलीस स्टेशन विरुध्द उदखेड या टिमने खेळाला सुरुवात केली. त्यात शिरजगाव पोलीस स्टेशनची टिम विजयी झाली या खेळामध्ये स्वतहा ठाणेदार सचिन परदेशी सुध्दा खेळले या क्रिकेट खेळामध्ये दोन बक्षिस ठेवण्यात आली आहे. पहिले बक्षिस ९९९९रु हे ग्रामपंचायत सरपंच सुषमा सचिन सोलव यांचे तरफे तर दुसरे बक्षिस ५७८६रु जि, सदस्य यांचे पती मनोज जैस्वाल यांचे तरफे ठेवण्यात आले.
शेअर करा