जोगेश्वरी ग्रामपंचायतीवर पून्हा एकदा शिवसेनाचा भगवा, सरपंच पदी गजानन बोंबले तर उपसरपंच पदी प्रवीण दुबिले

वाळूजमहानगर/प्रतिनिधी
ग्रुप ग्रामपंचयात जोगेश्वरी येथे शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे व आमदार आंबादासजी दानवे दादा यांच्या नेतृत्वाखाली आमोल लोहकरे यांनी पुन्हा एकदा भगवा फडकवला. सरपंचपदी गजानन बोंबले उपसरपंचपदी प्रवीण दुबिले यांची बिनविरोध निवड झाली. यात मोठा मोलाचा वाटा आमोल लोहकरे, किशोर लोहकरे, योगेश दळवी व सुनील वाघमारे यांचा आहे. यावेळी अमोल लोहकरे बोलतांना म्हणाले की पुन्हा एकदा सर्व मिळून गावाचा वाडीवस्थीचा विकासाचे ध्येय ठेऊन सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड केली. जनतेची सेवा करन्यासाठी आपल्याला जनतेने संधी दिली आहे या संधीचे सोने करण्याचे काम आपले आहे. यावेळी भारती साबळे, नजीरखा पठाण, मीना पनाड,हिरा सौदागर, रुख्मिणी काजळे, प्रभाकर काजळे , संगीता ठोकळ, शाईन शेख, सोनूताई अमोल लोहकरे,योगेश दळवी,योगिता आरगडे, प्रवीण थोरात , शीला वाघमारे, शांताबाई बिलवाल, अनिल वाघ आदि सदस्य यांचे अभिनंदन केले व पुढील कामास शुभेच्छा दिल्या. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.