जळगाव
पीआरपी तर्फे फैजपुरात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन

फैजपुर / राजु तडवी
दि. 6 रोजी फैजपूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शहरातील सुभाष चौक येथे सकाळी ११ वाजता शेतकरी विरोधी ३ काळे कायदे रद्द करण्यात यावे पेट्रोल डिझेल भाव वाढ मागे घेण्यात यावी कंगना राणावत ला जेल मध्ये टाकावे यासह विविध मागण्यांसाठी पीआर पी तर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जगन सोनवणे प्रदेश महामंत्री जिल्हाध्यक्ष शेख आरिफ अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष गोपी साळी ( छत्रपती सेना ) यांचे नेतृत्वात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला मागण्यांचे निवेदन तलाठी अप्पा जावळे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष अनवर खाटीक पी आर पी कार्यकर्ते अमजत भाई बाबू शाहा रुस्तुम तडवी ,मोसिन तडवी ,नाजीम भाई, अजमल भाई सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेअर करा