जळगाव

लुबना अमरीन यांचा फातेमाबी शेख महिला आदर्श पुरस्काराने सन्मान

फैजपूर / राजु तडवी

जळगाव येथील मुलींची हायस्कूल नं०२ च्या शिक्षीका लुबना अमरीन महेबूब अली यांनी आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक,सामाजिक तसेच महिला सबलीकरण त्याचप्रमाणे कोरोना महामारीच्या संकटकाळात केलेल्या निस्वार्थ कार्याची दखल घेत त्यांना मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. रावेर यावल मतदारसंघाचे आमदार शिरीष दादा चौधरी, जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील यांच्या हस्ते लुबना अमरीन महेबूब अली यांना सावित्रीबाई फुले महिला शिक्षक दिनानिमित्ताने फातेमा बी शेख महिला आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मुक्ताईनगर येथील हकीम चौधरी, साकळी येथील अस्लम शेख, सावदा येथील कृउबा समिती सदस्य व माजी उपनगराध्यक्ष असगर शेख यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close