अंतर्गत फैजपूर नगरपरिषद मार्फत “माझी वसुंधरा अभियान”सुरु

फैजपुर / राजु तडवी
माझी वसुंधरा अभियानास प्रारंभ झाला असून शासनाच्या निसर्ग बचाव कार्यक्रम अंतर्गत फैजपूर नगरपरिषद मार्फत “माझी वसुंधरा अभियान” राबविण्यात येत आहे. आपल्या सहभागामुळे माझी वसुंधरा अभियान मध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन आपली रँकिंग उंचावणे हे उदिष्ट आहे. शहरातील वायू प्रदुषण कमी होवून नॉन मोटराइज्ड वाहनांची संख्या वाढावी यासाठी फैजपूर नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे. विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्य़ासाठी पहिल्या ट्प्प्यात इलेक्ट्रिक दुचाकींसाठी मोफत चार्जिंग स्टेशन फैजपूर नगरपरिषदेमध्ये उभारण्यात आले. या चार्जिंग स्टेशनचा उपनगराध्यक्ष नयना चंद्रशेखर चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी फैजपूर नगरपरिषदेचे किशोर अशोकराव चव्हाण (मुख्याधिकारी), समाजसेवक चंद्रशेखर चौधरी, संतोष वाणी, निलेश दराडे, संगिता बाक्षे, सुधिर चौधरी, अश्विनी खैरनार तसेच सर्व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी वृंद इत्यादी उपस्थित होते.