जिल्हाधिकाऱ्यांनी केली म्हाडा कॉलनीची पाहणी

औरंगाबाद/प्रतिनिधी
म्हाडा कॉलनी येथे आज औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी भेट देवुन परिसराची पाहणी केली, व छावणी हद्द तसेच नागरिकांना होणार्या अडीअडचणी जाणुन घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण उपजिल्हाधिकारी रोडगे, यांच्या सोबत म्हाडाचे सिईओ अण्णासाहेब शिंदे, कर्नल अजय कैलास, मा.प्रशासक भुजंग, अप्पर तहसिलदार किशोर देशमुख, भुमुल्यांकन अधिकारी प्रीती चौडेकर, सहा कार्यकारी अधिकारी कपिल राजपूत, सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोडे, संतोष जाधव, साळवे, निकाळजे, विलास जोशी, खिल्लारे, तारामती भिसे आदीं अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी तिसगावचे उपसरपंच शिवसेना उपतालुकाप्रमुख विष्णु जाधव यांनी नागरिकांच्या अनेक समस्या जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या समोर मांडुन नागरिकांना होणारे त्रासापासुन लवकर तोडगा काढण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विष्णु पा जाधव, कचरु साळे, बाळु परदेशी, कल्पना गुडधे, कमल हजारे, कमल राऊतराय, संगीता कसाने, कचरु राऊतराय, किर्ती सुफलवार, मनिषा जाधव, ज्योती नामवंत संजय ढाकणे, राजु ढाकणे आदि नागरिकांची उपस्थिती होती.