औरंगाबाद
महालगाव येथे प्राथमिक उपकेंद्रात ४२शिक्षकांची कोरोना टेस्ट

महालगाव/प्रतिनिधी
वैजापूर तालुक्यातील महालगाव गटातील इयत्ता पाचवी ते आठवी पर्यातच्या शाळा दि.27जानेवारी पासून सुरू होनार आहे. त्या अनुषंगाने महालगाव येथे प्राथमिक उपकेंद्र गाढेपिपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजहंस माटे यांच्या प्रमुख उपस्थित ४२ शिक्षकांची कोरोना तपासणी साठी (R T P C R) स्वँब घेण्यात आले. यावेळी सर्व समुदाय आरोग्य अधिकारी सचिन पोकळे,आरोग्य साहाय्यक वाल्मिक पठाडे, आरोग्य सेवक देविदास पोकळे, सविता शिनगारे, गट प्रवर्तक दिपाली देवकर, भाऊसाहेब खामकर, आशा कार्यकत्या सरला रासने, संगिता जोशी, रमा पठारे, षा सोमवते हजर होते.
शेअर करा