लोकशाही व भारतीय राज्यघटना जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध रहा-आ. डॉ. तांबे
अमृत उद्योग समूहाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

संगमनेर/अमोल भागवत
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक राष्ट्रपुरुष व स्वातंत्र्य सैनिकांनी मोठे योगदान दिले असून नागरिकांना समानतेबरोबर लोकशाही प्रणाली असलेल्या समृध्द भारतीय रायघटनेचा जगात मोठा लौकिक असून ती जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहावे असे आवाहन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे असून अमृत उद्योग समूहाच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित बहात्तराव्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात ते बोलत होते .यावेळी समवेत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.विवेक धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्यंकटेश, डॉ. बाबासाहेब लोंढे डॉ. मनोज शिरभाते ,डॉ. मच्छिंद्र चव्हाण, जे बी शेटटी, एस.टी .देशमुख, शितल गायकवाड, उपप्राचार्य प्रा. अशोक मिश्रा, जी .बी. काळे, सिताराम वर्पे, नामदेव गायकवाड, प्रा. बाळासाहेब शिंदे , प्रा. सुनील सांगळे आदी उपस्थित होते. आमदार डॉ. तांबे म्हणाले की, भारत देश महासत्तेच्या दिशेने दमदार वाटचाल करत असून अनेक स्थित्यंतरे झाली असती तरी ही भारतीय लोकशाही प्रणालीवर सर्वांचा दृढ विश्वास असल्याने ती अधिक मजबूत झाली आहे. अनेक भाषा, अनेक वेश , धर्म,प्रांत, वेगवेगळे असूनही सर्व भारतीयांचे मन मात्र एकच हे सर्वांनी दाखवून दिले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी माळरानावर स्थापन केलेल्या येथील सहकाराने महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लौकीक निर्माण केला आहे. मागील वर्षी कोरोना संकटाने जगत थांबले. मात्र आता कोरोना नंतर सर्व पूर्वपदावर येत आहे. लसीचा शोध लावण्यात भारतीय शास्त्र-ा यशस्वी झाले असून आगामी काळात भारतीय तंत्र-ाानाचा जगावर दबदबा राहणे या अत्यंत अभिमानास्पद आहे. मात्र या सर्व परिस्थितीत लोकशाही व रायघटना टिकवण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सुरक्षापथकाने शिस्तबध्द संचलन करुन मानवंदना दिली. यावेळी अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, एमबीए ,डी फार्मसी, बी फार्मसी, आयटीआय ,मॉडेल स्कूल, इंटरनॅशनल स्कूल ,युनिअर कॉलेज या संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.