थोरात कारखान्यावर प्रजासत्ताक दिन साजरा

संगमनेर/अमोल भागवत
अनेक राष्ट्रपुरुषांच्या बलीदानातून स्वातंत्र्यलढ्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेल्या स्वातंत्र्य व 26 जानेवारी 1950 रोजी मिळालेली भारतीय राज्यघटना ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केली असून थोरात कारखान्याच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सह.कारखानाच्या कार्यस्थळावर आयोजित अमृत उद्योग समुहाच्या मुख्य ध्वजारोहन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर , उपाध्यक्ष संतोष हासे,संचालक रोहिदास पवार, डॉ. तुषार दिघे, अनिल काळे, विनोद हासे, कार्यकारी संचालक जे.बी.घुगरकर, केशव दिघे ,किरण कानवडे, शरद गुंजाळ ,भास्कर पानसरे शंकर ढमक, आदी उपस्थित होते. यावेळी ओहोळ म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली.अमृत उद्योग समूह हा गुणवत्तेने आता देशात अग्रगण्य म्हणून ओळखला जात आहे. येथील शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी गुणवत्तेबरोबर सातत्याने विविध उपक्रम राबविले आहे. कारखाने सातत्याने शेतकरी कामगार व तालुक्यातील नागरिकांसाठी मोठे योगदान दिले आहे . भारतीय लोकशाही हा सर्वांचा अभिमान असून सध्या मात्र काही शक्ती लोकशाही वर आघात करू पाहत आहे ते रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढले पाहिजे. देशाच्या एकात्मतेसाठी व विकासासाठी सर्वांनी संघटीत होवून योगदान द्यावे असे ही ते यावेळी म्हणाले. यावेळी कारखान्याचे सुरक्षापथकाने सुरक्षा अधिकारी त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली शिस्तबध्द संचलन करुन मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केले.तर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी अमृत उद्योग समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.