वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी वाचनालयांचे लोकार्पण- माजी आमदार कैलास पाटील
भगवतगीता ,कुराण, भारतीय संविधान ,इतिहासातील जुन्या पुस्तकांचे लोकमान्य वाचनालयास भेट

शहराच्या तालुक्याच्या विकासात अडथळा नका आणु, सगळ्यांनी विकासासाठी एकत्र या असे प्रतिपादन माजी आमदार तथा वाचनालय चे अध्यक्ष कैलास पाटील यांनी केले
पहिल्याच दिवशी एक हजार पेक्षाही जास्त पुस्तकांचे नागरिकांडून अर्पण.
गंगापूर / प्रतिनिधी
आजच्या डिजीटल युगात वाचन संस्कृती हरवत चालली असून तिचे जतन करण्यासाठी शहरात वाचनालायांचे लोकार्पण करण्यात येत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार कैलास पाटील यांनी केले. ते शहरातील वाचनालयांच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.हा कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजे २६ जानेवारी च्या मुहूर्तावर शहरातील श्रीराम मंदिर , विठ्ठल मंदिर परिसरातील मारुती चौक येथे सकाळी ९ वाजेला माजी आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील,मंगलबाई अर्जुनसिंग राजपूत ,बांधकाम सभापती अविनाश पाटील, नगरसेविका फरीदाबेगम मोहसीन चाऊस,नगरसेवक वकील दत्तात्रय साबणे ,कार्यालयीन अधीक्षक रुस्तुम फुलारे ,वकिल भानुदास जोशी ,वकिल संतोष जोशी ,शामसुंदर धूत,मोहसीन चाऊस,सुरेश नेमाडे, मोहित कुलकर्णी, वाजीद कुरेशी, बाबा बने,बदर जझुरी,नईम मंसुरी,विजय पानकडे ,
प्रदीप पाटील,बंटी पाटील,मारुती खैरे, दीपक साळवे,खालिद नाहदि ,सचिन विधाटे, विजय वरकड, रोहिदास कारभार,महावीर कटारिया, अमोल साळवे, रामेश्वर पाटील, वकील दत्तात्रय साबणे,बापुकाका कुलकर्णी, वकील किशोर कऱ्हाळे, वाल्मीक मनोरकर ,रुग्ण कल्याण समिती सदस्य अतुल रासकर ,राजेंद्र दारूटे,दिनेश राऊत,आकाश उदमले ,सतीश बारे,अनिल पाटील, अशोक पाटील, मनोज गायकवाड, प्रदीप तोडगिले ,मनोज मोहिते,अमोल काळसकर ,सौरभ कानडे,साक्षी कैलास साबणे,आदिती देवेंद्र सुवर्णकार ,सलीम जहागीरदार,ऋषिकेश होंडे,पत्रकार, डॉक्टर, व्यापारी, वकील,शिक्षक आदी मान्यवारांची यांची उपस्थिती होती ,याप्रसंगी नगरसेवक प्रदीप पाटील यांनी वाचन संस्कृतीला जतन करण्यासाठी वाचनालयांचे लोकार्पण करण्यात आल्याचे प्रतिपादन केले. नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.