गोविंदपुर येथिल ग्रामपंचायत व जिल्हा परीषद मराठी शाळा येथे प्रजासत्ताक दिन साजरा

चांदुरबाजार/ कैलास गजबे
चांदुरबाजार तालुक्यातिल गोविंदपूर या ठिकाणी आज दि,२६/०१/२०२१ रोजी ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परीषद मराठी शाळा येथील ध्वजारोहन शाळेच्या मुख्याध्यापक चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच ग्रामपंचायत येथील ध्वजारोहन योगेश सोलव यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा गांधी व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पुजन गोविंदपुर येथिल सरपंच सुषमा सोलव, सचिव रेखाते साहेब,तलाठी घुलक्षे, पोलिस पाटील प्रतिक्षा सोलव शाळेतिल शिक्षक तसेच अंगनवाडी येथिल कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरीक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला गावातिल महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन चौधरीसर यांनी केले तर सचिन सोलव यांनी आभार प्रदर्शन केले शाळेतील मुलांना बिस्किटचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वतेकरता ग्रामपंचायत कर्मचारी धिरज सोलव,संदिप बागडे,सवाई यांनी सहयोग केला.