डॉ श्रीनिवास तळवलकर यांचे निधन

गंगापूर/प्रतिनिधी
स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्मविभूषण परम पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले (दादा) यांचे जावई व स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर (दीदी) यांचे यजमान श्री डॉ. श्रीनिवास निळकंठ तळवलकर (रावसाहेब) यांचे अल्पशा आजाराने दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी दुखद देहावसान झाले. ते 72 वर्षाचे होते हिंदू कॉलनी माटुंगा येथे त्यांचे निवासस्थान होते हिंदू कॉलनीतील तळवलकर इस्पितळाचे तसेच रहेजा इस्पितळाचे संस्थापक सदस्य असलेले ज्येष्ठ मधुमेह तज्ञ कैलास वासी डॉक्टर नीळकंठ तळवलकर यांचे रावसाहेबस तळवलकर हे सुपुत्र होते स्वाध्याय परिवाराचे प्रचंड मोठे वैश्विक कार्य सांभाळत असताना रावसाहेबांची अत्यंत मोलाचे व खंबीर साथ दीदींना सतत होती. अखिल स्वाध्याय परिवारात रावसाहेब तळवलकर हे अत्यंत आदरणीय लाडके व्यक्तिमत्त्व होते रावसाहेब तळवलकर यांच्या अचानक जाण्याने स्वाध्याय परिवारातील लाखो स्वाध्याय परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर तत्वज्ञान विद्यापीठ ठाणे येथे दिनांक 19 जानेवारी रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले परंतु सध्याच्या covid-19 निर्बंधांमुळे अंत्यसंस्कार प्रसंगी कुटुंबातील काही निकटचे व्यक्तीच केवळ उपस्थित होते.