नाकाबंदी दरम्यान आढळले दहा लाख 41 हजार 150 रुपये केले जप्त, गंगापूर पोलिसांची यशस्वी कारवाई

गंगापूर/प्रतिनिधी
दिनांक14/12/2020 रोजी सायंकाळी गंगापूर येथील शिवाजी चौकात गंगापूर पोलिस नाकाबंदी करत असताना एक संशयित टॅरोना गाडी औरंगाबाद कडून वैजापूर कडे जात असताना मिळून आली, त्या गाडीची चेकिंग केली असता गाडी चालक व मालक प्रफुल्ल मधुकर सवयी वय 23 वर्ष राहणार वैजापूर यास विचारपूस केली असता त्यामध्ये रक्कम 10,41,150/- रुपये मिळून आली आहे, त्याबाबत त्यांना कुठल्या बँकेतून आणली याबाबत विचारणा केली असता ते सांगू शकले नाही, म्हणून सदर ची रक्कम जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई साठी इन्कमटॅक्स कार्यालयात औरंगाबाद यांच्याकडे कायदेशीर कारवाई करणे कामी पत्र पाठविण्यात आले आहे, सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, मा. डी.वाय.एस.पी. संदीप गावित, यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छिंद्र सुरवसे पोलीस निरीक्षक गंगापूर, पोलीस उपनिरीक्षक विलास गुसिंगे, पोलीस अमलदार मनोज बेडवाल, गणेश खंडागळे, रवी लोदवाल, कैलास निंभोरकर, सोमनाथ मुरकुटे, चालक गुंजाळ यांनी केली आहे.