गंगापूर तालुका एमआयएम पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल वानखेड़े तर शहरअध्यक्ष पदी फैसल बासोलान यांची निवड

गंगापूर/प्रतिनिधी
गंगापूर तालुका एम आय एम पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल वानखेड़े, यांची तर शहरअध्यक्ष पदी फैसल बासोलान यांची निवड करण्यात आली आहे. एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सय्यद इम्तियाज जलिल यांनी नुकतेच गंगापूर तालुका अध्यक्षपदी राहुल वानखेड़े, तर शहरअध्यक्ष पदी फैसल बासोलान यांना नियूक्तीचे पत्र देण्यात आले आहे. यावेळी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे म्हणाले की खासदार इम्तियाज जलील यांनी माझ्यासारख्या सामान्य आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी निश्चितच प्रमाणिकपणे पार पाडून ग्रामीण भागात पक्षाची विचारधारा नेऊन सर्वसामान्य गोरगरिबांचे बहुजन समाजाचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल येणार्या भविष्यकाळात सर्वसामान्य बहुजन वंचितांचे प्रश्न सोडवण्यावर भर देण्यात येईल. शहरअध्यक्ष फैसल बासोलान म्हणाले की खासदार इम्तियाज जलील यांनी शहराची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याने शहरात प्रत्येक वार्ड मध्ये शाखा स्थापन करून सर्वसामान्य जनतेची जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे सांगितले या निवडीबद्दल खासदार इम्तियाज जलील, डॉ गफ्फार कादरी, शारेक नक्षबंदी, नासेर सिद्दीकी, अरुणभाऊ बोर्डे, मुन्शी पटेल, समीर बिल्डर, डॉ कुणाल खरात, बिलाल जलील, वसीम अहमद, झिशान पटेल, अब्दुल्ला बिनहिलाबी, अब्दुल राफे, राजू चौधरी, मुबिन टोपीवाला, अब्दुल सत्तार, इम्रान खान, अशपाक सय्यद, मुबिन शेख, सय्यद हाश्मी, जुबेर सिद्दिकी, कलीम सौदागर आदींनी त्यांचे अभिनंदन केले.