कमळापूर येथे सुरु असलेली वीज चोरी थांबवून, या चोरीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वायरमनला निलंबित करा- वसंत आवटे

औरंगाबाद/प्रतिनिधी
ग्रुप ग्रामपंचायत जोगेश्वरी हद्दीत असलेल्या कमळापूर येथे दिवसाढवळ्या वीज चोरी सुरु आहे. आणि हि वीज चोरी येथील वायरमन शिंदे यांच्या आशीर्वादाने सुरु असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. आणि येथील नागरिकांनी असेही सांगितले आहे कि नवीन वीज जोडणी साठी जाणीवपूर्वक सर्वे अहवाल देत नाही, आणि पैसे मागतात, व गावामध्ये हि कधी येत नाही. अश्या अनेक तक्रारी नागरिकांमधून येत आहे. या निवेदनामध्ये असे सांगण्यात आले आहे कि कमळापूर व काही कमळापूर भागातील कॉलनीमध्ये राजरोष पणे वीज चोरी चालू आहे, आणि या वीजचोरीची शिंदे यांना चांगलीच मलाई देखील खायला मिळत आहे, असे या निवेदनातून सांगण्यात आले, तसेच या वायरमन विरोधात कठोर कारवाई करून नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा मुख्य अभियंता महावितरण औरंगाबाद यांच्या कार्यालयासमोर आंदोलन किव्हा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा हि या निवेदानाद्व्यारे देण्यात आला.