भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त युवासेना, शिवसेनेच्या वतीने आयोजित मोफत भव्य रोग निदान व आरोग्य शिबार

गंगापूर / प्रतिनिधी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त युवासेना ,शिवसेना यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबीर जुने कायगाव (ता.गंगापूर) येथे सोमवारी (ता.7) सकाळी घेण्यात आले.यात औरंगाबाद च्या सिग्मा हेल्थ फाउंडेशन ने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून 150 रुग्णांची आरोग्य तपासणी करून घेतली. या कार्यक्रमास परिसरातील नागरींकांचा उदंड प्रतिसाद मिळाला . या भव्य आरोग्य शिबिराचे उदघाटन युवासेना उपसचिव तथा माजी उप महापौर राजेंद्र जंजाळ,नेवासा येथील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,युवासेना जिल्हा प्रमुख मचिंद्र देवकर यांच्या हस्ते व शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा नगरसेवक अविनाश पाटील , नगरसेवक भैय्या पाटील ,पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे यांच्या उपस्थितीत झाले. ह्या वेळी सिग्मा ग्रुप हॉस्पिटल चे मुख्य संचालक डॉ उन्मेष टाकळकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे रुग्णांना मार्गदर्शन केले व आरोग्य बाबत माहिती दिली. या आरोग्य शिबिरात150 रुग्णांची तपासणी केली. तसेच 29 रुग्णांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. त्याच बरोबर गरजू रुग्णांना मोफत औषध उपचार देण्यात आले. या कार्यक्रमला उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण सांगळे, नगर चे पोलीस उपनिरीक्षक संजू बाबा गायकवाड ,उपजिल्हा संघटक गणेश राऊत, गंगामाई कारखान्याचे शेतकी अधिकारी एस.डी मनाळ, विभाग प्रमुख गोकुळ तांगडे, अविनाश इष्टके, प्रशांत गवळी,शुभम सोनवणे, विकी गाडेकार, गोपीचंद जाधव, नंदू भोगे, शांतीलाल कुटारे आदींची उपस्थीती होती. या मोफत सर्व रोग निदान शिबीरासाठी सिग्मा हेल्थ फाऊंडेनच्या वतीने डॉ.सायली तावडे, डॉ.वैभव नलावडे, डॉ.आकाश चोरमारे,रेणुका वैष्णव,शालीनी खोरे,ताराचंद चव्हाण,चंदा सुपेकर,सचिन जोगदंड, विशाल बनसोडे,गजानन महाजन यांनी कर्तव्यदक्ष आरोग्य सेवा बजावली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक राजूभाई पठाण, शिवाजी मिसाळ, राजेश मिसाळ, राधेश्याम कोल्हे यांनी खास परिश्रम घेतले.