औरंगाबाद

अज्ञात वाहानाच्या थडकेत दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यु

महालगांव/प्रतिनिधी

वैजापूर — गंगापूर रोडवर भगुर फाटा ता. वैजापूर  येथे अज्ञात वाहानानाच्या थडकेत एका लहान   मुलीचा मृत्यु झाल्याची घटना दि. 7 सकाळी नऊच्या सुमारास घडली दिक्षा राहुल मोरे वय दीड वर्ष असे मृत पावलेल्या मुलीचे नांव आहे. याविषयी मोरे कुटुंब हे वैजापूर गंगापूर रोड लगत भगुर फाट्यावर वस्तीवर राहत असुन सकाळी नऊच्या सुमारास आजी सकुबाई दत्तु मोरे शेतात काम करण्यासाठी जात असतांनी आजीच्या मागे नकळ जातांनी अज्ञात वाहानाने  उडवल्याने  दिक्षा राहुल मोरे हीचा मृत्यु झाला असुन या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close