डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फैजपूर येथे अभिवादन सभा
फैजपूर/प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फैजपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. समाजसेवक अशोक भालेराव यांच्या तर्फे या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. इंडीयन जर्नलिस्ट असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष व पत्रकार संस्था फैजपूर अध्यक्ष फारुक शेख अमीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन सभेस सुरुवात करण्यात आली.यावेळी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दुखीत, शोषीत जनतेसाठी केलेल्या कार्याची माहिती आपल्या मनोगतात व्यक्त केली. यावेळी फैजपूर पो.स्टे.चे स.पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे साहेब, काँग्रेस अनुसुचित आघाडी जिल्हाध्यक्षा प्रतिभा मोरे, मुख्यध्यापक गणेश गुरव सर, दे.टि.चौधरी पतसंस्था चेअरमन चंद्रशेखर चौधरी,एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख इरफान,युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष वसिम जनाब,कार्याध्यक्ष मुदस्सर नजर,युवा अध्यक्ष वसिम मयबुब तडवी, भाजपा शहर सरचिटणीस संजय सराफ,जन संघ प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, रियाज मेंबर, रामराव मोरे, अजय मेढे , देवेंद्र झोपे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्तावीक कार्यक्रमाचे आयोजक तथा समाजसेवक अशोक भालेराव यांनी तर सुत्रसंचलन मुख्याध्यापक गणेश गुरव सर यांनी केले.