औरंगाबाद
गळनिंब येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना विभागीय कृषी सह संचालक डॉ. डी.एस.जाधव

गंगापूर/प्रतिनिधी
गळनिंब (ता.गंगापूर)येथे विभागीय कृषी सह संचालक डॉ. डी.एस.जाधव यांनी शुक्रवारी( ता.4) शेत शिवारास भेट देत पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सोबत भगवान राव कापसे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबाद सहयोगी संचालक संशोधक डॉ. एस.बी.पवार,तालुका कृषी अधिकारी ज्ञानेशवर तारगे यांची उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना जाधव म्हणाले की,शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेतीच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी.तसेच आधुनिक तंतज्ञानाचा वापर करून उसाची उत्पादकता वाढवावी.शासकीय विविध योजनेचा लाभ घेऊन कृषी क्षेत्राची प्रगती साधावी. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी विष्णू मोरे, शेतकरी नेते कल्याणराव गायकवाड, घोडके, कृषी सहायक तागड आणि अगरवाडगाव,गळनिंब, भिवधानोर गाव परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
शेअर करा