ओबीसी आरक्षण प्रकरणी अप्पर जिल्हा अधिकारी यांना निवेदन

मालेगाव/प्रतिनिधी
भारतात ओबीसींची संख्या 52 टक्के आहे. तो सुसंघटित नाही असे असले तरी तो निद्रिस्त ज्वालामुखी आहे ,याची जाण व भान प्रत्येक राजकारणाने घेतली पाहिजे .ओबीसी आरक्षणात इतरांना वाटा दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा ज्येष्ठ पत्रकार भगवान बागुल यांनी येथे दिला. काल मालेगाव तालुक्यात ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार,रवींद्र साईनकर यांना निवेदन देण्यात आले, त्यावेळी ते उपस्थित ओबीसी कार्यकर्त्यांसमोर बोलत होते .पोलीस यंत्रणेने मोर्चास परवानगी नाकारल्याने ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने व समता परिषदेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार रवींद्र सायिनकर यांना निवेदन देण्यात आले. बागुल पुढे म्हणाले भारतीय लोकशाही त सर्वाधिक संख्या ओबीसींची आहे असे असूनही त्यांना अत्यल्प लाभ दिले आहेत. आणि त्यातील त्यांच्या लाभत इतरांना वाटा देण्याची चूक केल्यास सत्तांतर सुद्धा होऊ शकते. असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष रमेश उचित म्हणाले 1979 पासून मंडल आयोगाच्या शिफारशी राज्यात लागू आहेत त्यात ओबीसींना दिलेल्या सवलतीत अन्य समाजात समाविष्ट करू नये. याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते रामदास बोरसे म्हणाले ओबीसी संघटन हे तात्पुरते न राहता मजबूत झाले पाहिजे शासन मजबूत संघटनांचे ऐकत असते. याप्रसंगी एडवोकेट रमेश मोरे म्हणाले येत्या दहा तारखेला सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नावर बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अभ्यासू वकील नेमला पाहिजे व ही बाजू मांडली पाहिजे. काँग्रेस पक्षाचे ओबीसी चे राज्याध्यक्ष चंदू गवळी यांनी ओबीसी संघटनेच्या आरक्षणात इतरांना सामील करू नये, मराठा समाजात वेगळे आरक्षण द्यावे अशी मागणी केली. यावेळी माळी समाजातर्फे गुलाब पगारे, ज्ञानेश्वर बागुल, विनायक माळी, गुरव समाजातर्फे, राजेंद्र गुरव, भावसार समाजातर्फे विजय भवसार, क्षत्रीय समाजातर्फे राजेंद्र पवार, तेली समाजातर्फे एडवोकेट अनिता पवार, पेंढारी समाजातर्फे गोकुळ बेडेकर, ओतारी समाजातर्फे मयूर वांद्रे, शिंपी समाजातर्फे चंद्रकांत बेंडाळे, तांबोळी समाजातर्फे शाबान तांबोळी, कुंभार समाजातर्फे रामदास बोरसे, सुतार समाजातर्फे प्रभाकर जाधव, न्हावी समाजातर्फे संजय सोनवणे आदींनी आपला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी तालुक्यातील तेली माळी साळी क्षेत्रीय पेंढारी, शिंपी, वाणी, तांबोळी, कुंभार, सुतार, भावसार, गुरव, सोनार, कासार, लोहार, धोबी, गवळी, पिंजारी, साळी, मोमीन आदी समाजांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर होते. मेळाव्याचे आयोजन मनपाचे माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार भगवान बागुल, ओबीसी संघाचे तालुकाध्यक्ष रमेश उचित, समता परिषदेचे गुलाब पगारे, विनोद शेलार, बाळासाहेब बागुल आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी सुनील वडगे, राजेंद्र बडवणे, एडवोकेट संजय सोनवणे, राजेश जगताप, गोकुळ चौधरी, ताराचंद वेताळ, चेतन महाजन अधिक कार्यकर्ते हजर होते. शहर व तालुक्यातील ओबीसी संघटनांचे पदाधिकारी समता परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.