औरंगाबाद
सोशल डिस्टन्स चे पालन करत पदविधरांचे मतदान शांततेत

भिवधानोरा / प्रतिनिधी
गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे पदविधारांचे मतदान दिनांक 1 डिसेंबर रोजी सोशल डिस्टनसिंग चे पालन करत शांततेत पार पडले. या वेळी पोलीस प्रशासनाकडून कुठलाही अनुचित प्रकार तसेच कोरोनासारख्या आजाराची विशेष खबरदारी घेण्यात आली. या वेळी पंचक्रोशीतील सर्व पडविधरांनि आपला मतदानाचा हक्क बजावला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराच्या बाहेर पडणे काहींना शक्य झाले नाही, परंतु काहींनी आपले अमूल्य मत देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.
शेअर करा