दुचाकी व मोबाईल हिसाकावणारे एमआयडीसी वाळूज पोलिसांनी केले गजाआड

वाळूजमहानगर/प्रतिनिधी
पोलीस ठाणे MIDC वाळुज येथे विकास काशीनाथ जाधव, वय 26 वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. देवळाली प्रथमेश नगरी, सातारा परीसर, ता. जि. औरंगाबाद यांनी पो.स्टे.ला येवुन तक्रार दिली की, दिनांक ३ नोव्हेंबर रोजी फिर्यादी हे त्यांची दुचाकी क्र. MH20 CD6065 हीचेवर बसुन इंडोरन्स कंपनी एम. वाळुज येथे मुलाखत देण्यासाठी गेले असता एन.आर.बी.चौक रांजनगांव फाटा एम. वाळुज औरंगाबाद या ठिकाणी रात्री 20.30 वा. सुमरास फिर्यादीस फोन आल्याने मो.सा. थांबवुन फोनवर बोलत असतांना पाठीमागुन दोन अनोळखी मुले अचानक आली व एकाने फिर्यादीस मोबाईल हिसकावला व दुसऱ्याने फिर्यादी यांना धक्का देवुन मोटार सायकल बळजबरीने हिसकावून घेतली व विटावा रोडच्या दिशेने पळुन गेले अश्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्याचा तपास पो.उप.नि. सतिष पंडीत हे करीत आहेत. गुन्ह्याचे फिर्यादी यांनी फिर्याद देते वेळी त्यांची मोटार सायकल व मोबाईल बळजबरीने हिसकावून घेणारे इसमांचे वर्णण सांगीतल्याने पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो.नि. गौतम वावळे, पो.उप.नि. सतीष पंडीत व पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेतला व मिळालेल्या गुप्त बातमीवरून ईसम नामे १) अशोक विठ्ठल गुळे, वय 26 वर्षे, रा. राजमाता शाळेजवळ, पवन नगर, रांजनगांव, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद. 2) अजय मल्हारी सातव, वय 21 वर्षे, रा. वसा, ता. जिंतुर, जि. परभणी यांना ताब्यात घेवून विचारपूस करता त्यांनी वरील गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांना गुन्ह्यात दिनांक 30/11/2020 रोजी अटक करून त्यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे गुन्ह्यातील गेला माल मोटार सायकल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला असुन सदर आरोपीतांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मा. पोलीस उप आयुक्त निकेश खाटमोडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, पो.उप.नि. सतिष पंडीत, सफौ खय्युमखाँ पठाण, प्रकाश गायकवाड, नवाब शेख, राजाभाऊ कोल्हे, विनोद परदेशी, दिपक कोलमी, हरिकराम वाघ, बंडू गोरे, दिपक मतलबे यांनी केली आहे.