मसिआची अर्धवार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्दतीने संपन्न

औरंगाबाद/प्रतिनिधी
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर या लघुउद्योगाच्या सर्वात मोठ्या संघटनेची अर्ध वार्षिक सर्वसाधारण सभा अभय हंचनाळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. २६ नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात आली. कोरोना या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हि सभा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली. यावेळी सचिव राहुल मोगले यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले आणि ते मंजूर करण्यात आले. सचिव भगवान राऊत यांनी मागील तीन महिन्यातील कामकाजाच्या माहितीचे सादरीकरण केले. कोषाध्यक्ष बसवराज मोरखंडे आणि विकास पाटील यांनी मागील सहा महिन्यातील जमा खर्चाचा आढावा सादर केला आणि सभेने तो मंजूर केला. मागील तिमाहीमध्ये संघटनेचे सदस्यत्व घेतलेल्या उद्योजकांचे सभेमध्ये स्वागत करण्यात आले. संपादक राजेंद्र चौधरी आणि सह संपादक राजेश मानधनी यांनी संपादित केलेल्या मसिआच्या उद्योग संवाद या मासिकाच्या २०२०-२१ या वर्षातील दुसऱ्या अंकाचे प्रकाशन सभेमध्ये करण्यात आले. अध्यक्षीय भाषणामध्ये अभय हंचनाळ यांनी मसिआ तर्फे राबविलेल्या मसिआ कनेक्ट प्रोग्रॅमची माहिती दिली व पुढे डिसेंबर महिन्यात परत एकदा मसिआ कनेक्ट प्रोग्रॅम राबविणार आल्याचे सांगितले. मसिआ वाळूज ऑफिस मध्ये सुरु असलेल्या मसिआ UNDP Covid-१९ हेल्प लाईनच्या माध्यमातून सदस्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. वाळूज एम.आय.डी.सी मध्ये सतत होत असलेल्या चोऱ्या या विषयी माननीय पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक वाळूज यांच्या बरोबर झालेल्या चर्चेची माहिती दिली आणि त्यांच्या सूचनेनुसार प्रायोगिक तत्वावर खाजगी सुरक्षा रक्षकांमार्फत रात्रीची गस्त घालण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाळूज येथील एल, सी आणि एच सेक्टर मधील उद्योजकांनी मिळून खाजगी सुरक्षा रक्षक नेमले आहेत. या व्यवस्थेमुळे तेथील उद्योगांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा बसला अशी माहिती दिली. इतर सेक्टर मधील उद्योजकांनी एकत्र येऊन खाजगी सुरक्षा रक्षक नेमावे असे आवाहन अध्यक्षांनी केले. यावेळी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी उत्तरे दिली. या सर्वसाधारण सभेस माजी अध्यक्ष पृथ्वीराज शाह, विजय लेकुरवाळे, सुनील किर्दक आणि पदाधिकारी किरण जगताप, नारायण पवार, राहुल मोगले, भगवान राऊत, अब्दुल शेख, विकास पाटील, बसवराज मोरखंडे, राजेंद्र चौधरी, राजेश मानधनी, गजानन देशमुख, अनिल पाटील, सर्जेराव साळुके, अर्जुन गायकवाड, भीमराव काडावकर, संदीप जोशी, इत्यादी आणि बहुसंख्य सदस्य ऑनलाईन पद्धतीने सभेस उपस्थित होते.