अमरावती

तिवसा पोलीस स्टेशनसमोर धावत्या ट्रॅव्हल्सनं पेट घेतला; सुदैवाने बसमधील प्रवाशी सुखरूप

सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. बस मधील 52 प्रवाशी सुखरूप बाहेर

अमरावती/सचिन ढोके

रायपूरवरून सुरतकडे प्रवासी घेवून जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने सोमवारी मध्यरात्री 2 वाजताचे सुमारास पेट घेतला.सुदैवाने बसमधील 52 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश मिळाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवाशांनी बाहेर पडताच सुटकेचा श्वास घेतला.  सविस्तर माहिती अशी की,मध्यरात्री 2 वाजताचे सुमारास महेंद्रा कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक CG 19,F-0231 ही बस रायपूर वरून प्रवाशी घेवून नागपूर, अमरावती मार्गे सुरत कडे जात होती. दरम्यान नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावर हायवेवरील तिवसा पोलीस स्टेशन समोर अचानक या ट्रॅव्हल्स ने पेट घेतला.बसमधील सर्व प्रवाशी गाढ झोपेत असतांना अचानक बसमध्ये मोठ्या प्रमाणावर धुवा निर्माण झाल्याने ट्रॅव्हल्स पेटल्याचे समजताच बसमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला.तेव्हा तात्काळ तिवसा पो. स्टे.चे नापोको निलेश खंडारे यांनी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले.त्यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता.ट्रॅव्हल्सच्या कंडक्टर साईटचा मागील टायर फुटल्याने धावत्या ट्रॅव्हल्सने पेट घेतल्याचे समजते.सुदैवाने नगरपंचायतची तिवसा पोलीस स्टेशन ला अग्निशमन दलाची गाडी तयार होती.त्या आधारे चार गाड्या पाणी ओतून ही आग विझविण्यात आली.यासाठी तिवसा युवक काँग्रेस व नगराध्यक्ष वैभव वानखडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अतुल देशमुख, नगरपंचायत कर्मचारी सुरज शापामोहन, निखिल वानखडे, संदीप दाहाट, राहुल वानखडे, कार्यकर्त्यांनी आग विझविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. नागपूर ते अमरावती महामार्गावर तिवसा जवळ धावत्या ट्रव्हल्सनं अचानक पेट घेतला, सुदैवाने बसमधील ५२ प्रवाशांना वाचवण्यात यश… बस आगीत जळून खाक हायवेवर आग लागल्याने पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही बाजूला असलेलं ट्राफिक थांबवलं होत या दोन तासांनी वाहतूक पुन्हा पूर्वरत झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close