औरंगाबाद

सिडको प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे कृतिसमिती करणार धरणे व रास्ता रोको आंदोलन

२१ डिसेंबर रोजी सिडको प्रशासनाच्या विरोधात मोठे व्यापक जनआंदोलनात धरणे आंदोलन, रस्ता रोको

वाळूजमहानगर/प्रतिनिधी

सिडको प्रशासनाने दिनांक ३.३.२० रोजी सिडको वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याचा ठराव महाराष्ट्र शासनाकडे पाठविला होता. यावर अद्यापही शासनाने निर्णय घेतलेला नसून तरी सुद्धा सिडको प्रशासनाने ३ मार्च पासून सिडको वाळूज महानगर १, २ व ४ मधील रस्ते, ड्रेनेज लाईन, पाणी, मलनिस्तारण प्रकल्प, ले-आउट मंजुरीचे प्रकरण, क्रीडांगण पुलांची उभारणे, स्मशानभूमी इत्यादी विकास कामे थांबलेले आहे. या मुळे परिसरातील नागरिकांना आर्थिक तसेच माणसिक त्रास होत आहे. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत ही कामे चालू ठेवण्यात यावे. या अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, नगरविकास मंत्री सिडको चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्यप्रशासक यांना निवेदन दिले की सिडकोची स्थापना करताना मूलभूत सेवा-सुविधा विकास करण्याचे आश्वासन सिडको ने दिले होते ते पूर्ण न करता सिडको वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्यात येऊ नये. मात्र शासनाने या संदर्भात सिडको प्रशासनाला पत्र पाठवून ही यावर निर्णय घेत नाही शासनाकडे माहीती देत नाही. सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीने दि.१६.१०.२० रोजी स्मरण पत्र देऊन आंदोलन का करू नये म्हणून पत्र दिले. यानंतर वसाहत आधिकारी यांनी बैठक घेऊन निवेदनात मांडलेले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी चे आश्वासन दिले मात्र अद्याप यावर कुठलाही निर्णय प्रशासनाने व शासनाने न घेतल्यामुळे आज दिनांक २९ नोव्हेंबर २० रोजी सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे पदाधिकारी तसेच सिडको वाळूज महानगर मधील सोसायटीचे अध्यक्ष सचिव तसेच सिडको वाळूज महानगर १,२ व ४ मधील सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीमध्ये दि. २१ डिसेंबर २०२० रोजी सिडको प्रशासनाच्या विरोधात मोठे व्यापक जनआंदोलनात धरणे आंदोलन, रस्ता रोको करण्यात येणार आहे. तरी प्रश्न समस्या सुटल्या नाही तर आमरण उपोषण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, या बैठकीस सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठे उपाध्यक्ष , नरेंद्र सिंह यादव,शितल गंगवाल, चंद्रकांत चोरडिया, संतोष गाढे , माणिक कुलकर्णी, सुशीलकुमार सावंत, अनिल माळवदे ,प्रशांत वडांगळे, प्रकाश जाधव, कुवर दयालसिंग ,प्रमोद नाईक, शिंपी प्रशांत, चिंतामण शेट्टे, आप्पासाहेब गायके, विजय कसबे ,इंगोले गोविंद ,रोहिदास लोहार, संजय महाजन, प्रज्योत मादळे, फकीरचंद दाभाडे, ज्ञानेश्वर उबाळे, डॉ, विशाल जैन, निलेश भारती, कमलकिशोर काबरा इत्यादी नागरिकांची उपस्थिती होती.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close