अमरावती

अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत निवासी डॉक्टरवर रात्री प्राणघातक हल्ला, डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक

अमरावती/ सचिन ढोके

गुरुकुंज मोझरीत निवासी डॉक्टरवर रात्री प्राणघातक हल्ला झालाय. यात डॉक्टरांची प्रकृती चिंताजनक आहे. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयाच्या कॉर्टरमध्ये रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. मनोज सांगळे असं प्राणघातक हल्ला झालेल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर अमरावतीमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. आराम करत असलेल्या डॉक्टरांवर अचानक हल्ला अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी मधील श्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालय मध्ये मनोज सांगळे हे गेल्या अनेक वर्षांपासून निवासी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे कालही रुग्णालयात आपले काम केल्यानंतर रुग्णालयातच असलेल्या त्यांच्या कॉर्टरमध्ये आराम करायला गेले. अशातच रात्री साडेबाराच्या सुमारास दवाखान्याचा मागील गेटमधून काही हल्लेखोरांनी आता शिरून त्यांच्यावर धारधार शस्त्राने जोरदार हल्ला केला. हल्लेखोरांनी नंतर पळ काढला. हल्लेखोरांनी केलेला हल्ला एवढा भयंकर होता की, मनोज सांगळे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्यावर उपचार सुरूअशातच त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्याला फोन करून झालेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर डॉक्टर मनोज सांगळे यांना उपचारासाठी तात्काळ अमरावतीला रवाना करण्यात आले. अमरावतीमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पहाटे चार वाजता घटनास्थळी धाव घेतली असून सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close