शिवसेनेच्या दलित आघाडी तालुका तालुका संघटक पदी सुधीर खंडागळे

गंगापूर/प्रतीनीधी
शिवसेनेच्या दलित आघाडी तालुका तालुका संघटक पदी सुधीर खंडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, तसेच आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली. माजी खासदार चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आमदार अंबादास दानवे यांच्या आदेशाने जिल्हा संघटक मारुती साळवे यांनी सुधीर खंडागळे यांची गंगापूर तालुका शिवसेना दलित आघाडी संघटक पदाचे नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. शिवसेना या संघटनेची गावागावात जाऊन शिवसेना दलित आघाडीची मजबूत बांधणी करावी व पक्षाच्या हिताला वैचारिक बांधिलकीला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी, आपल्या हातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करावी म्हणून निवड करण्यात आली आहे. निवडी बद्दल शिवसेनेचे जिल्हा संघटक ऊत्तमराव गुढेकर, महाराष्ट्र सेना शहर प्रमुख डॉ अजय वारुळे, लहूजी सेना संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ भारस्कर, अल्लाबक्ष पठाण, (कडू पटेल)सुभाष खंडागळे, संतोष काळे, दिपक साठे आदींनी अभीनंदन केले आहेत.