औरंगाबाद

चोरीचा गुन्हा २४ तासात उघड, ५,८९,१२५ रुपयाच्या मुद्देमालासह आरोपी ताब्यात

वाळुज एमआयडीसी पोलीसांची कामगीरी

वाळूजमहानगर/प्रतिनिधी

पोलीस ठाणे एमआयडीसी वाळुज येथे फिर्यादी नामे रमेश महाराज तिवारी, वय 35 वर्षे, व्यवसाय प्रोडक्शन मॅनेजर, रा. प्लॉट क्र. बी-302 कासलीवाल मार्बल बीड बायपास, औरंगाबाद यांनी दिनांक २२ नोव्हेंबर रोजी रोजी पो.स्टे.ला हजर येवून तक्रार दिली की, ते संजु ॲटो प्रा.लि. कंपनी, प्लॉट क्र. C-7 या ठिकाणी प्रोडक्शन मॅनेजर म्हणुन कामावर असुन दिनांक 21/11/2020 रोजी त्यांचे कंपनीतील 5,89,125/- रु. किंमतीचे 1) डेम्पर हब, 2) स्पीड गेअर हबची पाहणी केली असता सदर साहित्य मिळुन आले नाही. यावर ते कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले असल्याचे त्यांचे निदर्शनास आल्याने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पो.स्टे. MIDC वाळूज गुरनं 625/2020 कलम 461, 380 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास सहा. पो.नि. गौतम वावळे हे करीत आहे. वर नमुद गुन्ह्याचे तपासादरम्यान पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.गौतम वावळे व कर्मचारी यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी जावुन CCTV फुटेजची पाहणी करुन गुन्ह्यातील गेला मालाचा व आरोपीचा शोध घेतला असता माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील गेला माल हा यापुर्वी कंपनीत ठेकेदारामार्फत नेमलेल्या कंत्राटी कर्मचारी नामे सतीष गोरखनाथ खोसे, वय 27 वर्षे, रा. घर क्र. 10828 शांतीनगर, रांजनगांव, शे.पुं. ता. गंगापुर, जि. औरंगाबाद याने चोरी केला असुन सदर आरोपीचा शोध घेवुन तो मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन अटके दरम्यान यातील आरोपी सतीष गोरखनाथ खोसे याने पोलीसांना दिलेल्या निवेदनावरुन गुन्ह्यातील 5,89,125/- रु. किंमतीचे 1) डेम्पर हब, 2) स्पीड गेअर हब जप्त करण्यात आले आहे. नमुद आरोपीस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सांगीतले की तो नमुद कंपनीम मागील दोन वर्षापासुन काम करत होता व त्याला दसरा सनाचे अगोदर 2 दिवसापुर्वी काही एक कारन नसतांना अचानकपणे कंपनीतुन काढुन टाकले त्यामुळे त्याने हे कृत्य केले असल्याचे सांगीतले आहे. सदर आरोपी हा पी.सी.आर. मध्ये असुन त्याचे ताब्यातुन आणखी मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे. सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मा. पोलीस उप आयुक्त निकेश खाटमोडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गौतम वावळे, पोह खय्युमखाँ पठाण, प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, रेवन्नाथ गवळे, नवाब शेख, विनोद परदेशी, दिपक कोलमी, हरिकराम वाघ, बंडू गोरे, दिपक मतलबे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close