बँड व्यवसायिकांना परवानगी द्या,एकता फाऊंडेशनची आ.शिरीष चौधरींकडे मागणी

फैजपुर / राजु तडवी
बँड व्यवसायिकांना विविध समारंभात बँड वाजविण्याची परवानगी मिळावी यासाठी एकता फाऊंडेशन फैजपूर तर्फे आ.शिरीष चौधरी यांना निवेदन देण्यात आले. कोरोना महामारी संकटकाळात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने बँड व्यवसायिकांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला आहे. एका पथकात वीस ते पंचवीस कलाकार काम करत असतात.अशा प्रकारे फैजपूर परिसरात अनेक बँड पथकं असुन या सर्वांवर लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ ओढवली आहे.बँड पथक उभारणीसाठी अनेकांनी बँकांकडून कर्ज घेतले असुन बँकांचा वसुलीसाठी ससेमीरा सुरू झालेला आहे. आता व्यवसाय बंद असल्याने पोटाची खळगी कशी भरावी? बँकेचा हप्ता कसा फेडणार? या विवंचनेत बँड पथकाचे कलाकार सापडले असुन संसार उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.म्हणून त्यांना लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमधे बँड वाजविण्याची परवानगी द्यावी तसेच सोशल डिस्टंस राखुन व शासनाचे सर्व नियम व अटी पाळून कमीत कमी कलाकारांसह व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळणेसाठी आ.शिरीषदादा चौधरी यांनी प्रयत्न करावे असे एकता फाऊंडेशन तर्फे आमदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यावेळी एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख इरफान शेख इकबाल, शेख शकील शेख बशीर, सुनील रुपचंद मोरे,अतिश काशिनाथ केदारे, प्रकाश उखर्डू मोरे, भुषण सुधिर मेढे, भाऊसाहेब लोंढे,निरज सोनवणे,बबन बडगे, विलास सपकाळे,राजू बोरसे, संजु मेढे इ.उपस्थीत होते.