जिल्हा परिषद शिक्षकांना मतदानाचा हक्क द्या;प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारणीत मागणी

खुलताबाद / प्रतिनिधी
6 ऑक्टोंबर 2018 च्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेचे कर्मचारी शासकीय सेवक नाहीत असे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे खाजगी संस्थेतील शिक्षकांप्रमाणे जिल्हा परिषद शिक्षकांनाही पदवीधर शिक्षक मतदार संघात उमेदवारी करण्याचा व मतदानाचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी केली आहे. शिक्षक समितीचे राज्य कार्यकारिणीची सभा निफ्टी बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झाली त्यावेळेस ते बोलत होते. राज्य सरचिटणीस विजय कोंबे, राजन कोरगावकर, संजय कळमकर ,राजेंद्र नवले,केदू देशमाने, सयाजी पाटील, शिवाजी दुशिंग ,राजेंद्र खेडकर,आबा शिंपी, राजेश सावरकर, रा.या.औटी,संजय धामणे,नितीन वाकडे, गोकुलदास राऊत, यावेळी उपस्थित होते. राज्याध्यक्ष उदय शिंदे म्हणाले प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न खऱ्या अर्थाने सुटायचे असतील तर शिक्षक मतदार संघातून प्रतिनिधी निवडून जाणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षक मतदार संघातून मतदानाचा व उमेदवारी करण्याचा हक्क मिळाला पाहिजे,त्यासाठी निवडणूक आयोगाकडे अग्रह करू नाहीतर या हक्कासाठी न्यायालयात जाण्याची समितीची तयारी आहे. असे सांगून त्यांनी डीसीपीएस व एनपीएस योजना, वीस पटाच्या आतील शाळा बंद करण्यास विरोध करणे,नवीन शैक्षणिक धोरणातील त्रुटी, बदली धोरण इत्यादी प्रश्नांचा उहापोह केला. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनावर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 26 नोव्हेंबरला होणाऱ्या राज्य कर्मचारी कृती समितीच्या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.जुन्या पेन्शन हक्का करिता शिक्षक समिती आग्रही आहे याकरिता राज्य जिल्हा व तालुका आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.शिक्षक बदली धोरण कसे असावे याबाबत प्रत्येक जिल्हा शाखांनी आपली लेखी मते, शिफारशी सुचवाव्यात. असे राज्य सरचिटणीस यांनी सांगितले.समिती व गुरुकुलच्या नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचे सत्कार राज्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.राहुरीचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी समितीत जाहीर प्रवेश केलात्यांचा सत्कार उदय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.पाथर्डी तालुका गुरुकुल मंडळाचे अध्यक्ष प्रवीण तुपे यांनी वाढदिवसानिमित्त गुरुकुल पालकत्व योजनेस दोन हजार एक रुपयांची देणगी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिताराम सावंत,सुदर्शन शिंदे, भास्कर नरसाळे,संजय नळे,विजय महामुनी, राजेंद्र पट्टेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.असे शिक्षक समितीच्या प्रसिद्ध विभागाने कळविले आहे. कोरोनाची नव्याने तयार होणारी लस टोचून घेण्यासाठी समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे (वर्धा) यांनी स्वयंसेवक म्हणून या प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले ‘ लसीचा पहिला डोस टोचून घेताना तुम्ही पंधरा मिनिटात मरु ही शकता.’ असे आम्हाला सांगण्यात आले होते, पण समाजासाठी माझी ती ही तयारी होती. आतापर्यंत दोनदा लस टोचून घेतल्याने माझ्या शरीरात मोठ्या प्रमाणात प्रतिपिंडे तयार झाल्याचे अहवाल आले असून मी ठणठणीत आहे.सर्वच समितीच्या कार्यकर्त्यांनी समाजाप्रती असेच संवेदनशील रहावे असे आवाहन केल्याचे औरंगाबाद शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड,नितीन नवले,शाम राजपूत, शालिकराम खिस्ते, गुलाब चव्हाण,विष्णू भंडारे,अशोक डोळस, जावेद अन्सारी,मोहंमद गौस, के.के.जंगले, अंकूश वाहूळ, चंदू लोखंडे, लक्ष्मीकांत धाटबळे,जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी,कडूबा साळवे,के.डी.मगर,अर्जुन पिवळ,कैलास ढेपले, दत्ता खाडे,पंकज सोनवणे,प्रकाश जायभाये,पंजाबराव देशमुख, मंगला मदने,वर्षा देशमुख,शितल भडागे,फातेमा बेगम, शिलाताई बहादुरे, बबन चव्हाण,विलास चव्हाण,निंबा साळुंके, विलास साळुंके, मच्छिंद्र निमोणे,राजेंद्र मुळे,अंकुश चव्हाण, पदमाकर हिलजुते, भाऊसाहेब बोर्डे,एन.एस चव्हाण यांनी सांगितले.