मावसाळा जिल्हा परिषद शाळा पाडली का पडली ?

खुलताबाद / प्रतिनिधी
खुलताबाद तालुक्यतील मावसाळा गावातील जिल्हा परिषद ची जुन्या शाळेतील दोन वर्ग खोल्या बंद होत्या. त्या पाडण्यात आल्या, पण मुख्यध्यापकांनी वरिष्ठांची परवानगी न घेता या दोन खोल्या पाडण्यात आल्याची चर्चा सर्वत्र गावात पसरली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, मावसाळा गावात जिल्हा परिषद शाळा आहे, तेथिल दोन वर्ग खोल्या पाडण्यात आल्या. शाळा पडल्याची बातमी सर्वत्र गावात पसरली. त्यामुळे याबाबतीत सत्यता पाहण्यासाठी आमचे प्रतिनिधी सलमान खान व इतर पत्रकार मंडळीनी भेट दिली असता दोन खोल्या तोडल्याचे तेथील गावकऱ्यांनी सांगितले.
तेथे पडलेल्या मलब्यावरून मजबूत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. तसेच पन्नास टक्के हजेरीनुसार मौसाळा शाळेत एकही शिक्षक शाळेत हजर नव्हता. नंद्रावाद शाळेतील शिक्षक व विद्यार्थी हजर होते. त्यांचे पत्रकाराने फोटोही काढले आहेत. याबाबत गटशिक्षणाधिका ऱ्यांशी भ्रमण ध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मला काही वेळापूर्वीचा पत्रकाराचा फोन आला होता. त्यांना संगीतले की,सदर शाळा जुनी झाली होती. असे मुख्याध्यापिकेनी सांगितले. बांधकाम विभाग व शिक्षणाधिकारी याची शाळा पाडण्याबाबत परवानगी आहे का नाही? मला कल्पना नाही , मी नवीन आहे. मी शाळेबाबत सविस्तर माहिती घेऊन आपणास कळवितो असे सांगितले.