पळसवाडी येथे दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

खुलताबाद / प्रतिनिधी
खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे जातीय वाचक शिवीगाळ केली म्हणून दोघा गुन्हा दाखल झाला असून माधव दिगंबर जगताप व यादव उर्फ दादा दिगंबर जगताप रा. पळसवाडी अशी आरोपींची नावे आहे. खुलताबाद पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार तालुक्यातील पळसवाडी येथील फुलसिंग धनसिंग भेंडे वय 25 वर्ष व्यवसाय व्यापार यांच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार पळसवाडी येथील रहिवासी माधव दिगंबर जगताप व यादव उर्फ दादा दिगंबर जगताप यांनी शनिवार दि. 7 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पळसवाडी तालुका खुलताबाद येथील पूजा बूट हाऊस समोर जगताप ने पाणी फिल्टर चे शेड टाकले असता फिर्यादी आरोपीस बोलण्यास गेला की तुमचे हे शेड बांधकाम माझ्या दुकानासमोर येत असून या बांधकामामुळे रोडवर ही अडथळा निर्माण होत आहे. तरी आपण ते काढून घ्यावे असे सांगावयास गेलो असता वरील आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर अपमान करीत पाणउतारा व्हावा या उद्देशाने जातीवाचक शिवीगाळ केली व सदर जागा ही माझ्या बापाची असून तुमचा काय संबंध येते असे म्हणून पाणउतारा केला यावरून फुलसिंग धनसिंग भेंडे यांच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात माधव दिगंबर जगताप व यादव उर्फ दादा दिगंबर जगताप या दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कन्नड नेहूल हे करत आहे.