म्हैसमाळ तलावात एका तरूणाचा बुडून मृत्यू ;अग्नीशमन दलाच्या जवानांनी बुडालेला युवकाचा मृतदेह काढला पाण्या बाहेर

खुलताबाद / प्रतिनिधी
खुलताबाद तालूक्यातील म्हैसमाळ येथील तलावात एक तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून नंदकुमार सुरेश बडवे वय 25 वर्ष असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. आगाठाण तालूका गंगापूर येथील नंदकुमार बडवे व त्याचा मित्र आकाश बाबुलाल गुरे राहणार शिरगाव तालूका गंगापूर हे दोघेजण रविवार रोजी दुपारी आगाठाण येथून मोटारसायकल क्रमांक MH-20-EH 5707 हिरो मोटारसायकलवर फुलंब्रीकडे जाण्यासाठी निघाले होते खुलताबाद येथून जात असताना म्हैसमाळ येथील गिरजादेवी देवीचे दर्शन घेऊन फुलंब्रीकडे जाऊ असा निर्णय दोघां मित्रांनी घेतला व दुपारी तीनच्या सुमारास खुलताबाद येथून म्हैसमाळकडे रवाना झाले म्हैसमाळ येथे जाऊन दोघांनी बाहेरून गिरजादेवीचे दर्शन घेतले व परत फुलंब्रीकडे जाण्यासाठी मोटारसायकलवर निघाले दोघे रस्त्यावरून जात असताना त्यांना तलाव नजरेस पडला व दोघे जन तलाव जवळ गेले तलावा जवळ गेल्यावर नंदकुमार यांनी तलावात उतरण्याचा निर्णय घेतलार व नंदकुमार हा तलावात उतरला त्याला पाण्यात पोहता येत नव्हते पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला काही वेळात नंदकुमार तलावात बुडाला सदरिल घडलेली घटना त्याच्या मित्राने इतरांना सांगितली पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांना माहिती मिळताच त्यांनी म्हैसमाळ येथे घटनास्थळी धाव घेतली व तत्काल अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले सहा वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान म्हैसमाळ येथे येऊन तलावात बुडालेल्या तरूणाचा शोध सुरू केला एका तासाच्या आत अग्निशमन दलाच्या जवानांनी बुडालेल्या तरूणाचा शोध लावला व बुडालेल्या तरूणाचा मृतदेह पाण्या बाहेर काडला नंदकुमार याचा मृतदेह खुलताबाद येथील शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आण्यात आला होता. नंदकुमार हा शेती व्यवसायसह आगाठाण येथे विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्या सोबत विद्युत जोडणीचे काम करत होता रविवार रोजी सकाळी नंदकुमार याने आगाठाण येथील विद्युत रोहित्र ( डिपी ) बंद करून मित्रा सोबत फुलंब्रीकडे निघाला होता रस्त्यात नंदकुमार याला गावातील विद्युत वितरण सुरू कधी होणार म्हणून फोन येत होते असे नंदकुमार सोबत असलेल्या मित्राने माहिती दिली आहे नंदकुमार तलावात बुडून मृत्यू झाल्या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस कर्मचारी भुसारे हे करत आहे.